Tuesday, October 15, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात बुधवार 30 ऑक्टोंबर  2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 16 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 30 ऑक्टोंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


यशवंतनगर येथे विविध कार्यक्रमांचे
माध्यमातून महिला मतदार जनजागृती
नांदेड दि. 15 :- 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक 2019 करिता महिला मतदारांची मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कक्षाचे माध्यमातून 13 ऑक्टोंबर 2019 रोजी यशवंतनगर येथे महिला मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत उपस्थीत महिलांनी मतदान जनजागृती संबंधी भारूड, गीत, आदी सादर केले. त्यामध्ये डॉ.उज्वला सदावर्ते व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या मतदान जनजागृती नाटीकेस मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच सर्व उपस्थित महिलांनी प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली व मतदान जनजागृती संदेशपर पत्रक वितरीत केले. यानंतर सर्व सहभागी महिलांनी परिसरात मतदार जनजागृती रॅली काढली. या कार्यक्रमात महिलांनी स्वयं स्फुर्तीने सहभाग घेतला.
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी श्रीमती कविता जोशी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियेाजन 86 नांदेड उत्तरर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील रुस्तुम आडे, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर, श्री वाकोडे यांनी केले.
00000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...