तालुकास्तरीय
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबीराचा विद्यार्थ्यांनी
लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड,
दि. 14 :- जिल्हयातील तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन शिबीराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्वल नांदेड” नाविन्यपूर्ण
योजना सन 2019-20 अंतर्गत तालुकास्तरावर संत गाडगेबाबा सार्वजनिक
वाचनालय गोकुंदा किनवट येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच आयोजित
करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी
श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी आमदार भिमरावजी केराम, किनवटचे अतिरीक्त
जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक, प्रमुख वक्ते बाल विकास प्रकल्प अधिकारी
कैलास तिडके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मागील अकरा वर्षापासून सातत्याने 'उज्ज्वल नांदेड' अतर्गंत चालणाऱ्या या
मार्गदर्शन शिबिरामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत.
यापुढे पण त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विविध उपक्रम राबण्यासाठी जिल्हा
प्रशासन प्रयत्नशिल राहील, असे श्री. डोंगरे यांनी सांगितले.
नांदेड जिल्हा प्रशासन अंतर्गत "उज्वल नांदेड” ही नाविन्यपूर्ण योजना सन 2019-20 मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांनी
तालुकास्तरावर होणाऱ्या शिबीरांचा देखील लाभ घेण्याबाबत आवाहन जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी केले.
आमदार भिमरावजी केराम व अतिरीक्त जिल्हाधिकारी
तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांनी देखील त्यांच्या अनुभवातुन विद्यार्थ्याना
अभ्यास कसा करावा याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख वक्ते कैलास तिडके यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी बाबत तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायक व सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची
उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे अध्यक्ष उध्दव रामतिर्थकार
यांनी केले. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांची
उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उध्दव रामतिर्थकार, पाटील अकॅडमीचे श्री पाटील व मॅडम, विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रतिनिधी श्री येलने, रवी जाधव, शिवाजी गायकवाड तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक
परिवर्तन अभियानात कार्यरत ग्रामपरिवर्तक इर्शाद शेख, संतोष देवसरकर, पांडुरंग मामीडकर, प्रशांक काळे व इतर प्रयत्न केले.
00000