Tuesday, January 14, 2020


विशेष सहाय योजनेच्या लाभार्थ्यांना
बचत खात्याबाबत आवाहन
नांदेड, दि. 14 :- मुदखेड तालुक्‍यातील विशेष सहाय योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे चालु बॅंक खाते, पोष्‍ट कार्यालयाचे बचत खाते संबंधीत गाव तलाठी यांच्‍याकडे सोमवार 20 जानेवारी 2019 पर्यंत जमा करावीत. ज्‍या लाभार्थ्‍यांकडे  खाते नाहीत अशा लाभार्थ्‍यांनी तात्‍काळ त्‍यांच्‍या जवळच्‍या बॅकेत बॅंक खाते उघडण्‍याचे, आवाहन  मुदखेड तहसिलदार यांनी केले आहे.
जिल्‍हयातील संगायो, श्राबायो व इंगायो योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना आयसीआयसीआय बॅंकेमार्फत बायोमॅट्रीक पध्‍दतीने अनुदानवाटप करण्‍यास अनेक अडचणी येत आहेत. जिल्‍हयातील विशेष सहाय योजनेच्‍या लाभार्थ्यांना अनुदान वाटपाबाबत शासन निर्णय 20 ऑगस्ट 2019 मधील तरतुदीनुसार लाभार्थ्‍यांना अनुज्ञेय अनुदानाचे वितरण बॅंक खाते, पोष्‍ट बचत खाते (पोष्‍ट ऑफिसचे सेव्हिंग खाते) यामार्फत वितरीत करण्‍याबाबत निर्देशित करण्‍यात आले आहेत.        
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...