Tuesday, January 14, 2020


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न
नांदेड, दि. 14 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची तिसरी त्रैमासिक बैठक  अति. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात  13 जानेवारी रोजी पार पडली.
बैठकी दरम्यान तंबाखू सेवनाची सद्यस्थिती, कोटपा कायदा 2003 व डिसेंबर अखेर नांदेड जिल्ह्याचे कामकाजाची माहिती जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी दिली. 
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री बोराळकर, शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, बी. आर. कुंडगीर, डी. आर. बनसोडे, बंडू अमदुरकर तथा सहाय्यक आयुक्त कामगार यांचे प्रतिनिधी श्रीकांत भंडाखार आदि उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   847   इस्राईलमध्ये  5  हजार रोजगाराच्या   संधी   नांदेड दि.  13  ऑगस्ट : -  जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार...