Sunday, January 16, 2022

 नांदेड जिल्ह्यात 643 व्यक्ती कोरोना बाधित 

तर 95 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालापैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 558 तर अँटिजेन तपासणीद्वारे 85 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 806 एवढी झाली असून यातील 88 हजार 383 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 768 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 325, नांदेड ग्रामीण 35, भोकर 3, देगलूर 9, धर्माबाद 14, हिमायतनगर 3, कंधार 19, किनवट 17, लोहा 15, उमरी 4, मुदखेड 47, मुखेड 18, नायगाव 2, अकोला 4, परभणी 19, लातूर 1, हिंगोली 2, जालना 4, वाशीम 7, बुलढाणा 1, अमरावती 1, तेलंगना 1, औरंगाबाद 2, दिल्ली 1, गोंदिया 1, गडचिरोली 1, यवतमाळ 1, भिवंडी 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 39, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 1, भोकर 1, बिलोली 16, देगलूर 2, किनवट 4, मुदखेड 3, मुखेड 9, नायगाव 5, परभणी 1, हिंगोली 1, जालना 1 असे एकुण 643 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 86, खाजगी रुग्णालय 5, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल मधील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

 

आज 2 हजार 768 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 530, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 193, खाजगी रुग्णालय 17 अशा एकुण 2 हजार 768 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 18 हजार 564

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 10 हजार 573

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 93 हजार 806

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 383

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.21 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-87

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 768

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 दाभड बावरीनगर येथील धम्म परिषदेचे ऑनलाईन आयोजन 

·         कोरोना स्थितीमुळे परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यास मनाई   

नांदेड (जिमाका) दि. 16 :- पस्तीसाव्या आखील भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन 17 व 18 जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील दाभड बावरीनगर येथे करण्यात आले आहे. परंतु देशासह राज्यात कोरोना व ओमिक्रॉम विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या धम्म परिषदेचे ऑनलाईन प्रसारण करण्यात येणार आहे. भाविकांनी दाभड बावरीनगर येथे न येता ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा. या परिसरात दुकाने व स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये समुहाला बाहेर पडणे व फिरण्यासाठी सकाळी 5 ते 23 व रात्री 23 ते 5 यावेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी कमाल मर्यादा 50 व्यक्तींची ठेवण्यात आली आहे. ही धम्म परिषद ऑनलाईन प्रसारीत होणार असून या परिसरात दुकाने व स्टॉल लावण्यास मनाई केल्याची माहिती धम्म परिषदेचे आयोजक डॉ. सी. पी. गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

बावरीनगर दाभड येथील आयोजित ही धम्म परिषद राज्य शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करुन होणार आहे. ही धम्म परिषद ऑनलाईन प्रसारीत केली जाणार आहे. भाविकांनी दाभड बावरीनगर येथे न येता ऑनलाईन दर्शन घ्यावे. या परिसरात कोणीही दुकाने व स्टॉल लावू नयेत. नांदेड पोलीसदल, बावरीनगर दाभड कमिटी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अर्धापूर तहसिलदार उज्ज्वला पांगरकर व पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी संयुक्तपणे केले आहे.   

000000

 

शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित

प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्यात मूल्याची वृद्धी होणार नाही. हे लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषि विभागाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत भोकर तालुक्यातील भोसी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या हळद, मसाले प्रक्रिया उद्योगास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गीते, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यांना शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेतून लाभ देण्याचे निश्चित केले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत साधारणत: 1 कोटी रुपयाच्या प्रकल्पासाठी 60 टक्के जास्तीत जास्त 60 लाख रूपयापर्यंतचे अनुदान देय राहणार आहे.

 

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत  बारड येथील  शेतकरी नवनाथ देशमुख यांनी लाभ घेतलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते रोपवाटीकेचे उद्घाटन करण्यात आले. या रोपवाटिकेत विविध प्रकारच्या मिरची, वांगी, टोमॅटो, टरबुज, खरबुज आदी फलोत्पादन पिकांची रोपे योग्य दरात उपलब्ध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून 75 भाजीपाला रोपवाटीका स्थापन करण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. एका रोपवाटीकेस 2 लाख 30 हजार अनुदान देण्यात येणार आहे.  बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भेट देऊन स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत थेट विक्री केंद्रास त्यांनी भेट दिली. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.

0000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...