Tuesday, July 14, 2020


सुधारीत वृत्त क्र. 648   
शेतकऱ्यांनी कापसाच्या विक्रीसाठी
तहसिल कार्यालय व सहायक निबंधक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाची खरेदी येत्या 3-4 दिवसात संपणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीविना त्यांचे घरी पडून असेल आणि ज्यांना शासकिय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे, त्यांनी तात्काळ संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्यादृष्टिने ही योजना असून यात जर व्यापाऱ्याचा कापूस शेतकऱ्यांच्या नावे कापूस खरेदी केंद्रावर विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा कापूस हा चांगला प्रतीचा असल्याचे तात्काळ लक्षात येते हे लक्षात घेता त्याबाबतही योग्य ती काळजी विक्री केंद्रावर नियमानुसार घेतली जाणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता कापुस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
शासनाच्या आदेशानुसार कापसाची हमीभावाने खरेदी सुरू करण्याची परवानगी जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत अर्धापूर तालुक्यातील सालासार कॉटस्पिन कलदगाव, हदगाव तालुक्यातील नटराज कॉटन तामसा, नायगाव तालुक्यातील जय अंबिका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी कुंटूर,  भारत कॉटन नायगाव, भोकर तालुक्यातील व्यंकटेश कॉटन पोमनाळा,  मनजीत कॉटन भोकर, धर्माबाद तालुक्यातील मनजीत कॉटन व एल. बी. पांडे, धर्माबाद व किनवट तालुक्यातील एम. एस. कॉटेक्स प्रा. लि. चिखली फाटा किनवट यांना दिली आहे.
जिल्ह्यात कोव्हिड पुर्वी कापूस पणन महासंघ, सी.सी.आय., खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी यांच्यामार्फत एकूण 39 हजार 873 शेतकऱ्यांचा 8,61,252.71 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कापसाचे सन 2019-20 या वर्षासाठी सर्वसाधारण क्षेत्र 3413.49 हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 2318.10 हेक्टर क्षेत्र आहे. कापसाची सरासरी उत्पादक 9 क्विंटल प्रती हेक्टर असल्याचे कृषि विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते.
महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी करण्यासाठी तालुकानिहाय ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन लिंकवर दि. 25 एप्रिल, 2020 पर्यंत एकूण 35,134 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी लिंकवर नोंदणी करताना दुबार नोंदणी केली होती. अशा दुबार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळल्यानंतर एकूण 28,159 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली असल्याचे दिसून आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व कापूस उत्पादक शेतकरी यांच्या विनंतीनुसार सदर ऑनलाईन लिंक पुन्हा  25 मे, 2020 पर्यंत सुरू करण्यात आली होती. या कालावधीत पुन्हा नव्याने एकूण 9,392 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचे स्तरावर एकूण 2,297 शेतकऱ्यांची ऑफलाईन नोंदणी केली आहे. असे जिल्ह्यात एकूण 39,848 शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केली आहे.
या कालावधीत काही कापूस खरेदी केंद्रावर अपघात, पावसामुळे खरेदीत व्यत्यय, जिनिंग फॅक्ट्रीमध्ये लागलेली आग, संचारबंदीमुळे कामगार त्यांचे गावी निघून जाणे इत्यादी कारणामुळे खरेदी केंद्रांना त्यांचे पूर्ण क्षमतेने कामकाज करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या व उपलब्ध जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीची संख्या पाहता सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेळेत खरेदी होणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची खरेदी पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याच्या शेजारील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय कापूस निगम (CCI) चे पांढरकवडा, झरी जामणी, घाटंजी व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्या उमरखेड, आर्णी, महागाव (गुंज), महागाव (खडका), पुसद व दिग्रस या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना तसेच नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागालगत तेलंगणा राज्यातील भारतीय कापूस निगम (CCI) चे मदनूर, भैंसा आणि सोनाळा याठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या कापसाची खरेदी होण्यासाठी शासनास लेखी विनंती केली होती. परंतू तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्थानिक कापसाची खरेदी पुर्ण झाल्याशिवाय इतर जिल्ह्यातील कापसाची खरेदी करण्यास विरोध दर्शविल्यामुळे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कापसाची खरेदी होऊ शकली नव्हती.
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी         दि. 17 जून, 2020 च्या आदेशान्वये सर्व उपविभागीय अधिकारी यांना तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्यामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष असलेल्या कापसाची पडताळणी करण्यासाठी गावपातळीवर सर्व्हेक्षण करणेबाबत आदेशीत केले होते. या पडताळणीमध्ये जिल्ह्यात एकूण 9,450 शेतकऱ्यांकडे अंदाजे 2 लाख 5 हजार 434 क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.
पडताळणीअंती शिल्लक असलेल्या सर्व कापसाची खरेदी करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुधारित आदेशाद्वारे आदेशीत केले आहे. कोव्हिड नंतर 13 जुलै 2020 अखेर एकूण 11 हजार 543 शेतकऱ्यांचा 2,46,420.28 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात केवळ कंधार व नायगाव तालुक्यातील जवळपास 1 हजार 12 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. या शिल्लक कापसाची खरेदी येत्या 3-4 दिवसात संपणार आहे. तेंव्हा याव्यतिरिक्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस खरेदीविना त्यांचे घरी पडून असेल आणि ज्यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे. त्यांनी तत्काळ संबंधित तालुक्यातील तहसीलदार व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरेदी केंद्रावर चांगला प्रतीचा कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
000000      

वृत्त क्र. 647   
कोरोनातून 5 व्यक्ती बरे 40 बाधित
हिंगोली येथील एकाचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड जिल्ह्यात आज 14 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 40 व्यक्ती बाधित तर हिंगोली येथील एका महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. आज एकुण 250 अहवालापैकी 196 निगेटिव्ह अहवाल आले. आजवर एकुण  बाधितांची संख्या 690 एवढी झाली आहे. 5 बाधित आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 390 बाधितांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
सोमवार 13 जुलै रोजी मंगळवार पेठ हिंगोली येथील 45 वर्षाच्या कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 36 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 39 वर्षाची 1 महिला, पद्मजा सिटी असर्जन नांदेड येथील 36,38,44,52 वर्षाचे 4 पुरुष, 14 व 35 वर्षाच्या 2 महिला, रहिमपूरनगर नांदेड येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, गणराजनगर नांदेड येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, गानिपुरा नांदेड येथील 65 वर्षाची 1 महिला, काबरानगर नांदेड येथील 24 वर्षाचा 1 पुरुष, हडको नांदेड येथील 65 वर्षाची 1 महिला, साधनानगर देगलूर येथील 13 व 21 वर्षाचे 2 पुरुष, 10, 17,29,65 वर्षाचे 4 महिला, किनवट येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, इमामवाडी ता. कंधार येथील 25 वर्षाची 1 महिला, फुलवाल कंधार येथील 64 वर्षाचा 1 पुरुष, मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 31 वर्षाचा 1 पुरुष, 25 व 32 वर्षाच्या 2 महिला, हासनाद ता. मुखेड 24 वर्षाची 1 महिला, गोरक्षण गल्ली ता. मुखेड येथील 10, 31 वर्षाचे 2 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, बालाजी गल्ली नर्सी ता. नायगाव येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, 22 वर्षाची 1 महिला, श्यमानगर नर्सी ता. नायगाव येथील 17, 19 वर्षाचे 2 पुरुष, 37 व 19 वर्षाच्या 2 महिला, हदगाव येथील 35 वर्षाची 1 महिला, पटेलनगर ता. धर्माबाद येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, ग्रा. रु. धर्माबाद येथील 31 वर्षाचा एक पुरुष, विठ्ठल मंदिर जवळ शिवाजीनगर ता. धर्माबाद येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, गंगाखेड जि. परभणी येथील 48 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.  
आज रोजी 264 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 15 महिला बाधित व 19 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 392 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.
आज रोजी एकुण 690 बाधितांपैकी 36 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 390 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 264 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 76, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 80, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 34, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 13, जिल्हा रुग्णालय येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 9, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 5 बाधित, धर्माबाद कोविड सेंटर येथे 3 बाधित, कंधार कोविड सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 19 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 950,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 728,
निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 50
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 40
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 690,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,
मृत्यू संख्या- 36,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 390,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 264,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 392 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.                    
00000


जागतिक युवा कौशल्य दिनानिमित ऑनलाईन
समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्र
नांदेड (जिमाका) दि. 14 :- जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कोरोना विषाणुचा संसर्ग तसेच लॉकडाउन सद्यस्थिती लक्षात घेता ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचे बुधवार 15 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. तांत्रिक शिक्षण आणि करिअर संधी, मुलाखत तंत्र या विषयावर हे सत्र दुपारी 2 वा. करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड अंतर्गत बुधवार 15 जुलै 2020 रोजी दुपारी 2 वा. Techincal education & Career Opportunities with Interview Technices या विषयावर ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन google meet वर Meeting https://meet.google.com/bum-ggbq-ezs लिंकवर आयोजीत करण्यात आले आहे. यावेळी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक श्री. नरवाडे हे समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहे. तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्र. सो. खंदारे हे मार्गदर्शन करणार आहे.
ऑनलाईन मार्गदर्शन लिंक : Meeting https://meet.google.com/bum-ggbq-ezs या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे. https://meet.google.com/rik-icok-xwg या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करुन घ्यावे. आपण Google meet app मधुन कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video mice mute बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक unmute सुरु करून विचारावे व लगेच माईक mute बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावे. वेबिनारबाबत काही अडचण आल्यास 02462-251674 या नंबरवर संपर्क साधावा, असेही आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...