Monday, March 15, 2021

 

कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

  शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद राहतील

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढत होत असल्याने 10 मार्च रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आणखी काही आवश्यक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेज हे 15 ते 31 मार्च 2021 या कालावधीत पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.   

यापूर्वी आदेशात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय/राज्य/विद्यापीठ/शासन/शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीतजास्त प्रचार प्रसिद्धी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 बाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. तसेच कोविड-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हॅन्ड सॅनीटायझरचा वापर आदी बंधनकारक राहील. 

हा आदेश 15 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 31 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. सर्व संबंधित विभागांनी या आदेशाची तंतोतंत पालन व अंमलबजावणी करावी. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

0000

 

नांदेड जिल्ह्यात आज 414 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू

जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 826 अहवालापैकी 414 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 238 तर अँटिजेन तपासणीद्वारे 176 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 27 हजार 371 एवढी झाली आहे. सोमवार 15 मार्च 2021 रोजी किनवट तालुक्यातील जुनातांडा येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 617 एवढी झाली आहे. 

आजच्या 1 हजार 826 अहवालापैकी 1 हजार 320 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 27 हजार 371 एवढी झाली असून यातील 23 हजार 907 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 625 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 58 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 117, माहूर तालुक्यांतर्गत 10, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 13 असे एकूण 166 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 87.34 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 184, अर्धापूर तालुक्यात 2, देगलूर 6, हदगाव 3, लोहा 12, उमरी 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 6, भोकर 6, धर्माबाद 12, किनवट 2, नायगाव 1, यवतमाळ 1 असे एकूण 238 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 235, बिलोली तालुक्यात 1, हदगाव 2, किनवट 7, मुदखेड 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 13, देगलूर 1, कंधार 1, लोहा 2, मुखेड 10, नागपूर 1 असे एकूण 176 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 625 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 104, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 46, किनवट कोविड रुग्णालयात 47, मुखेड कोविड रुग्णालय 41, हदगाव कोविड रुग्णालय 5, लोहा कोविड रुग्णालय 24, महसूल कोविड केअर सेंटर 109, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 597, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 359, खाजगी रुग्णालय 195 आहेत. 

सोमवार 15 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 87, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 25 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 51 हजार 926

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 19 हजार 807

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 27 हजार 371

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 907

एकुण मृत्यू संख्या-617

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 87.34 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-85

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-321

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 625

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-58.

0000

 

 

सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना

काम वाटप करण्यासाठी समितीची बैठक

नांदेड, (जिमाका) दि. 15 :-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना लॉटरी पद्धतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक सोमवार 22 मार्च 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड येथे दुपारी 12 वा. घेण्यात येणार आहे. इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी यांची नोंद घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी केले आहे.

0000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. मंगळवार 16 मार्च 2021 रोजी सकाळी 11.10 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. दुपारी 12.40 वा. मुंबई विमानतळ येथे आगमन होईल.

00000

 

कोविड उपचारासाठी प्रशासकीय यंत्रणांना योग्य त्या खबरदारीचे निर्देश

- पालकमंत्री अशोक चव्हाण

·         कोरोना प्रार्दूभाव नियंत्रणासाठी पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली  सर्व विभागप्रमुखांची बैठक संपन्न 

 नांदेड, (जिमाका) दि. 15 :- मागील दोन आठवड्यापासून इतर महानगरासमवेत जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या काळजी करण्यासारखी आहे. हा प्रार्दुभाव अधिक वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश दिले असून, जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजना संदर्भात शासन कमी पडणार नाही असा विश्वास  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. 

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी  डॉ. खुशालसिंह परदेशी , अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.      

जिल्ह्यात यापुर्वी कोरोना उपचारासाठी प्रत्येक तालुकानिहाय जी यंत्रणा उभी केली होती त्यात आरोग्याच्यादृष्टिने अत्यावश्यक उपचाराच्या सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष चालणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून प्रशासकीय यंत्रणाना निर्देश दिले.  

जिल्ह्यातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थाच्या इमारती कोविड सेंटरसाठी तयार ठेवण्याच्या दृष्टीने त्याची पाहणी करून तेथे सर्व प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. आरोग्याबाबतच्या सोयी सुविधा सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी अधिक दक्ष असावे असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी  सांगितले.  

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभाच्यावतीने  सुक्ष्म नियोजन झाले आहे.  कोरोना बधितांना ऑक्सीजन व औषधी कमी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

जे कोरोना बाधित गृहविलगिकरणात आहेत त्यांनी बाहेर पडून इतरांच्या आरोग्याला  बाधा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून काळजी घेण्यासाठी शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. ज्या परिसरात  कोरोना बाधिताची संख्या अधिक प्रमाणात आढळून आली आहे. अशा परिसराचे सुक्ष्म नियोजन करुन तेथे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बैठकीत ठेवण्यात आली. 

नागरिकांनी गर्दी टाळून, त्रिसुत्री कार्यक्रमाचा अवलंब  करावा असेही, आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.

00000





    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...