Monday, March 15, 2021

 

कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

  शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद राहतील

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढत होत असल्याने 10 मार्च रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आणखी काही आवश्यक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेज हे 15 ते 31 मार्च 2021 या कालावधीत पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.   

यापूर्वी आदेशात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय/राज्य/विद्यापीठ/शासन/शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीतजास्त प्रचार प्रसिद्धी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 बाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. तसेच कोविड-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हॅन्ड सॅनीटायझरचा वापर आदी बंधनकारक राहील. 

हा आदेश 15 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 31 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. सर्व संबंधित विभागांनी या आदेशाची तंतोतंत पालन व अंमलबजावणी करावी. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...