वृत्त क्र. 147
00000
वृत्त क्र. 147
00000
वृत्त क्र. 146
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या
लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकामार्फत फेर पडताळणी
नांदेड दि. 27 जानेवारी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांकडून इकेवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी महिलाकडून विनंती करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत, याची फेरपडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत करण्याचे शासनाने 20 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत. सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी/सेवानिवृत्ती संदर्भातील विहित निकषानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे.
शासन निर्देशानुसार e-KYC मध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याची यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेली आहे. तरी लाभार्थी महिलांनी गोंधळून न जाता, आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा. लवकरच सदर फेरपडताळणीची कार्यवाही करण्यात येणार असून, सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ जिल्हा यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 145
राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेची जय्यत तयारी
29 जानेवारी रोजी स्पर्धेचे उदघाटन
राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता
नांदेड दि. 27 जानेवारी :- नांदेड येथे राष्ट्रीय शालेय नेटबॉल (14 वर्षेमुले-मुली व 17 वर्षेमुली) क्रीडास्पर्धा सन 2025-26 चे आयोजन 27 जानेवारी ते 01 फेब्रुवारी,2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून जवळपास एक हजार ते 1 हजार 200 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आयोजन समिती, राष्ट्रीय नेटबॉल् क्रीडा स्पर्धा राहुल कर्डिले यांचे अध्यक्षतेखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पर्धा आयोजन- नियोजन समिती, खेळाडू स्वागत समिती, निवास व भोजन समिती, मैदान, तांत्रीक, वाहतूक, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त, स्थानिक पर्यटन, सांस्कृतीक कार्य समिती, स्वच्छता व इतर समिती गठीत करण्यात आली असून स्पर्धेची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेचा उदघाटन कार्यक्रम 29 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 वा. श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे बाबा बलविंदरसिंघजी व इतर मान्यवर यांचे हस्ते होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र व नांदेडकरांसाठी एक मेजवानीच राहणार आहे. तरी या स्पर्धेसाठी जिल्हयातील खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले-मुली व 17 वर्षे मुली) क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर 2 ते 26 जानेवारी, 2026 या कालावधीत इंदिरा गांधी मैदान, नांदेड येथे संपन्न झाले आहे.
या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभाग होणार आहे. सदर संघाची जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक 14 वर्षे मुले- मुलीसंघाकरीता समिर सिखीलकर- पुणे व प्रवीण कुपटीकर- नांदेड तर संघव्यवस्थापक म्हणुन संजय चव्हाण-नांदेड व रुकसाना मुलानी- सांगली हे आहेत. तर 17 वर्षे मुली संघाकरीता क्रीडा मार्गदर्शक म्हणुन निखील पोटदुखे- चंदप्रूर हे तर संघ व्यवस्थापक म्हणुन महेशकुमार काळदाते- परभणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या संघात खालील खेळाडूंचा समावेश असून यामध्ये 14 वर्षे मुले- कार्तिक वाघ-धुळे, निखिल राजपूत-पुणे, यश पावडे-अमरावती, राज वाघ-धुळे, साहिल मुलानी-सांगली, साई गजभारे-नांदेड, अनमोल जाधव-भंडारा, विरोचन शिंदे-छ.संभाजीनगर, अनिरुध्द लंगोटे-सांगली, आयुष येरणे-चंद्रपूर, धनुष झावरे-संगमनेर तर 14 वर्षे मुलीच्या संघात – भावनागावडे-धुळे, सृष्टी गायकवाड-हिंगोली, वेदिकातनपुरे-अहिल्यानगर, मोहिनी पडोळे- अमरावती, नंदिनी जगदेवे-भंडारा, अनुष्का गायकवाड-सांगली, गीताकांबळे-नांदेड, ऋतुजावाघ-धुळे, समृध्दीपवार-भंडारा, दुव्रादापले- मुंबई, रोशनी बनसोडे-सांगली, रक्षितारवीकुमारबकवाड-नांदेड, तसेच 17 वर्षे मुलीच्या संघात अक्षता कोकणे-अहिल्यानगर, विशालाक्षी राठी-अहिल्यानगर, नेत्राकांसरा-मुंबई, अनुष्का चामलाटे-अमरावती, पुर्वश्री योगेश वाघ- नाशिक, सईइजाते-परभणी, कविता नाईक-पुणे, कुशी हलमारे-गोंदिया, अश्विनी व्ही.तांबारे-नांदेड, जिज्ञासा जिवनसिंग चौहाण-छ.संभाजीनगर, आघाव जान्हवी-धुळे, ईशा पाटील-सांगली या खेळाडूंचा समावेश आहे.
सदर राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर समारोप कार्यक्रम प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, (राज्य क्रीडा मार्गदर्शक), मारोती सोनकांबळे, क्रीडा अधिकारी, बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन) श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, प्रवीण कुपटीकर (सचिव), कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, (संघटना) रवीकुमार बकवाड, सुमेध गायकवाड आदीनी शुभेच्छा दिल्या.
00000
वृत्त क्र. 144
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनी
मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा
13 फेब्रुवारीपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 जानेवारी :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच या पूर्वी अर्ज सादर केले आहे, परंतु लाभ न मिळालेल्या बचत गटानी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज बचतगटाच्या नावे देण्यात येईल. एका बचतगटास एकच अर्ज मिळेल. त्यासंबंधी बचतगटाने कागदपत्रे सोबत आणावेत. परिपूर्ण भरलेले आवश्यक असलेली कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह अर्ज 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासकीय सुट्टी वगळुन कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, यांची नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सन २०२5-२6 मध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गंत अर्ज करण्यासाठी मुदत 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी खालील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक राहील.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचत गट असावा, बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. नोंदणीकृत बचत गटामध्ये किमान १० सदस्य असावेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असावेत. बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे व रहिवाशी प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे असणे आवश्यक आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटांचेअध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बचत गटाने व गटातील सदस्यांनी यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या १० टक्के (३५ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट) स्व-हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या १० टक्के (कमाल रुपये ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. तालूका निहाय उद्दिष्ट नुसार कार्यवाही करण्यात येईल.अर्जाची संख्या उद्दिष्ठापेक्षा जास्त आलेली असल्यास पात्र अर्जदारांची निवड ही ड्रॉ (लॉटरी) पध्दतीने करण्यात येईल. बचत गटातील किमान एका सदस्याकडे सदरचे वाहन चालविण्याचा सक्षम अधिका-यांचा परवाना असावा, अथवाप्रशिक्षण घेतले असलेबाबत प्रमाणपत्र असावे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उप साधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रुपये ३.१५लाख) पेक्षा जादाची रक्कम संबंधीत बचत गटाने स्वतः खर्च करावी लागेल. प्रस्ताव परीपूर्ण सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांची राहील. रुपये ३५ हजारचा डिमांड ड्राफ्ट Assistant Commissioner Social Welfare Nanded या नावे काढावा.
00000
वृत्त क्र. 143
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 27 जानेवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार 28 जानेवारी रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पिंगळी जि. परभणी कडे प्रयाण करतील.
00000
जीस वैलनेस क्लब अंबरनाथ की पौलमी कुलकर्णी जी आप सभी को श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५०वें शहीदी समागम के लिए आमंत्रित करती हैं। महाराष्...