वृत्त क्रमांक
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवि रामू कलोसे
19 व 20 नोव्हेंबरला नांदेड दौऱ्यावर
नांदेड, दि. 16 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवि रामू कलोसे हे 19 व 20 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वा. ते लातूर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.30 वा. त्यांचे नांदेड येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सभागृहात मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी आणि सफाई कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी, समस्या व विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारी 1 वा. ते पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 3 वा. मोटारीने उमरखेडकडे प्रयाण करतील.
***