Monday, November 16, 2026

वृत्त क्रमांक

निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची विशेष सुविधा !

नांदेड कोषागार कार्यालयात १८ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कार्यशाळा ; 

निवृत्तीवेतनधारकांना सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड, दि. १६ : राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, नांदेड यांच्या वतीने १८ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ‘जीवन प्रमाण’ या संकेतस्थळाद्वारे डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सर्व निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल पद्धतीने हयातीचे दाखले सादर करणे अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक नोंदणी, पोर्टलचा वापर आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेची माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. या कार्यशाळा जिल्हा कोषागार कार्यालय, नांदेड येथे दररोज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी (स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवृत्तीवेतनधारक वगळून) या सुविधेचा लाभ घ्यावा. बँक शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून हयातीच्या दाखल्यासंदर्भात स्वाक्षरी केली असली, तरी ‘जीवन प्रमाण’ प्रणालीद्वारे डिजिटल हयातनामा सादर करण्यासाठी कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंडे यांनी केले आहे.

**

No comments:

Post a Comment

वृत्त   मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबरला दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प या वि...