Sunday, August 9, 2026

वृत्त क्रमांक

एलपीजी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी

नांदेड जिल्ह्यातील घरगुती गॅस ग्राहकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. 9 ऑगस्ट 2026 : नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. गॅस पुरवठा नियमित व सुरळीत राहण्यासाठी ग्राहकांनी विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

गॅस एजन्सीवर ई-केवायसी कशी करावी?

ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सीला आधार कार्ड व गॅस पासबुक घेऊन भेट द्यावी. एजन्सीवर बायोमेट्रिक अर्थात अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मोबाईल ॲपद्वारेही ई-केवायसीची सुविधा

ग्राहकांना घरबसल्या संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही ई-केवायसी करता येणार आहे. यासाठी IndianOil One, Bharatgas किंवा HP Pay यांसारख्या अधिकृत ॲपचा वापर करून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल.

ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क देऊ नये. अंतिम मुदतीच्या वेळी होणारी गर्दी व धावपळ टाळण्यासाठी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करा उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून झाडांवरील ताण कमी करण्याचे आवाहन नांदेड(जिमाका),...