Tuesday, April 25, 2023

 

District Information Office Nanded dionanded23@gmail.com

12:23 PM (0 minutes ago)
to vinod

नायगाव येथे 27 एप्रिल रोजी बेरोजगार

युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे 27 एप्रिल 2023 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे सकाळी 10 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462) -251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी 

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा जिल्ह्यातील 46 केंद्रावर येत्या शनिवार 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये या 46 परीक्षा केंद्रावर नवोदय चाचणी परीक्षा चालू असतांना परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही.  परीक्षा कालावधीत सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 यावेळेत परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध केले आहे.

00000

 समता पर्व निमित्त ऊसतोड कामगांराचे पुर्नआगमन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 25 :-सामाजिक समता पर्वानिमित्त ऊसतोड कामगारासाठी पुर्नआगमन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी करणे, ओळखपत्र वाटप करणे, ऊसतोड कामगांरासाठी आरोग्य तपासणी शिबिर, धान्य महोत्सव निमित्त आनंदाचा शिधा वाटप करणे अशा विविध उपक्रमावर आधारित मार्गदर्शन शिबिर 22 एप्रिल रोजी मुगट येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर हे होते. यावेळी समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे, ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांनी ऊसतोड कामगारांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते ऊसतोड कामगाराना ओळखपत्र वाटप करण्यात आले.


यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी आनंदा झंपलवाड, पी.जी.वडगावकर, बालाजी खुपसे, तालुका समन्वयक एस.जे.डोंगरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळा मुगट, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0000

 समता पर्व अभियानात शिष्यवृत्ती

माहिती संदर्भात विशेष अभियान कार्यक्रम संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वानिमित्त समान संधी केंद्रामार्फत शिष्यवृत्तीच्या माहितीसंदर्भात विशेष  अभियानातर्गत कार्यक्रम  विविध महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले.

नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर, महात्मा गांधी जैवतंत्रज्ञान पोखर्णी, भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्युट सिडको नांदेड, गणशांती नर्सिग स्कूल नांदेड येथे समता पर्वानिमित्त समान संधी केंद्र अंतर्गत भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांच्या माहिती संदर्भात विशेष अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी व समस्याचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमास समाज कल्याण निरीक्षक सुकेशनी व्हडगीर, लिपिक बोराटे, तालुका समन्वयक विजय माळवदकर, नर्सिंग स्कूल हडको चे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कलंत्री,  सुर्यवंशी तसेच हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगरचे मोतेवार यांची उपस्थिती होती.

0000

तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द - अपर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर


 तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात

आणण्यासाठी शासन कटिबध्द

-         अपर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर

नांदेड (जिमाका) दि. 25 :- दैनंदिन आयुष्यात वावरताना सर्वांनी तृतीयपंथी यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन  कटिबध्द असल्याचे अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी सांगितले. समता पर्वनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सामाजिक समता पर्वानिमित्त 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्यासाठी ओळखपत्र वाटप व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संजय वारकर, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी, कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमर गोधने, तृतीयपंथीयांचे गुरु फरीदा बकस आदीची उपस्थिती होती.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्ती जनजागृती शिबिर व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तृतीयपंथीयांना समाजात प्रतिष्ठा मिळावी व त्यांना समाजाने मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे म्हणून शासन प्रयत्नशिल असून नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथी यांच्यासाठी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांनी स्पष्ट केले.

0000 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...