Tuesday, April 25, 2023

 समता पर्व निमित्त ऊसतोड कामगांराचे पुर्नआगमन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 25 :-सामाजिक समता पर्वानिमित्त ऊसतोड कामगारासाठी पुर्नआगमन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी करणे, ओळखपत्र वाटप करणे, ऊसतोड कामगांरासाठी आरोग्य तपासणी शिबिर, धान्य महोत्सव निमित्त आनंदाचा शिधा वाटप करणे अशा विविध उपक्रमावर आधारित मार्गदर्शन शिबिर 22 एप्रिल रोजी मुगट येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर हे होते. यावेळी समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे, ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांनी ऊसतोड कामगारांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते ऊसतोड कामगाराना ओळखपत्र वाटप करण्यात आले.


यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी आनंदा झंपलवाड, पी.जी.वडगावकर, बालाजी खुपसे, तालुका समन्वयक एस.जे.डोंगरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळा मुगट, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...