Thursday, July 19, 2018


सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 19 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 20 जुलै 2018 रोजी नागपूर येथून शासकीय वाहनाने सायं. 5.30 वा. नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड येथे आषाढी महोत्सव 2018 या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ - शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड. सायं 7 वा. नांदेड येथून जालनाकडे प्रयाण करतील.
00000


दहावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ
विद्यार्थ्यांची नाव नोंदणी 30 जुलै पासून
नांदेड, दि. 19 :- इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2019 या परीक्षेसाठी खाजगीरित्या (फॉर्म नं. 17) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सोमवार 30 जुलै 2018 पासून सुरु करण्यात येत आहे, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.
खाजगी विद्यार्थ्यांने दहावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन सोमवार 30 जुलै 2018 ते शनिवार 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत भरावीत. मंगळवार 31 जुलै 2018 ते शनिवार 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावीत. शुक्रवार 31 ऑगस्ट 2018 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...