Saturday, May 22, 2021

 

       23 मे रोजी सर्व लसीकरण केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण  

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य  

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व 90 लसीकरण केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 23 मे रोजी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या एकुण 6 केंद्रांवर कोविशिल्ड या लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  कौठा, सिडको या हॉस्पिटलचा समावेश आहे. तर शहरी दवाखाना दशमेश हॉस्पिटल येथे कोविशिल्डचे 50 डोस व शिवाजीनगर येथे कोविशिल्डचे 40 डोस दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या  लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यातील रुग्णालय उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहे. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, हदगाव, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड अशा एकुण 14 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोविशिल्डचे 30 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सीनचे 30 डोस, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे कोव्हॅक्सीनचे 10 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 21 मे पर्यंत एकुण 4 लाख 13 हजार 988 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 22 मे पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झाला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 5 हजार 340 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

 

नांदेड जिल्ह्यात 169 व्यक्ती कोरोना बाधित

7 जणाचा मागील दोन दिवसात मृत्यू

205 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 275 अहवालापैकी 169 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर अँटिजेन तपासणीद्वारे 63 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 896 एवढी झाली असून यातील 83 हजार 897 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 845 रुग्ण उपचार घेत असून 63 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 21 मे 2021 रोजी भगवती कोविड रुग्णालयात हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी येथील 68 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालयात मनाठा येथील 45 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 59 वर्षाचा पुरुष, माहूर येथील 60 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे भोकर येथील 58 वर्षाची महिला, नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष तर दिनांक 22 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे किनवट तालुक्यातील शिरणी येथील 70 वर्षाची महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 845 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 45, देगलूर 11, कंधार 2, नायगाव 2, लातूर 1, नांदेड ग्रामीण 7, धर्माबाद 2, लोहा 3, उमरी 4, यवतमाळ 1, अर्धापूर 4, हदगाव 4, माहूर 1, हिंगोली 5, वाशिम 1, भोकर 4, हिमायतनगर 1, मुखेड 5, परभणी 3 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 15, देगलूर 3, किनवट 3, नायगाव 3, मुदखेड 6, नांदेड ग्रामीण 1, धर्माबाद 4, लोहा 1, उमरी 1, अर्धापूर 4, हदगाव 3, माहूर 3, हिंगोली 2, बिलोली 8, हिमायतनगर 2, मुखेड 3, परभणी 1 असे एकूण 169 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 205 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 5, अर्धापूर तालुक्यांतर्गत 22, भोकर तालुक्यांतर्गत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 8, नायगाव तालुक्यांतर्गत 4, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, बिलोली तालुक्यांतर्गत 17, खाजगी रुग्णालय 53, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 71, उमरी तालुक्यांतर्गत 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, लोहा तालुक्यांतर्गत 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 725 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 37, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 57, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 55, बारड कोविड केअर सेंटर 14, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 16, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, भोकर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 11, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 32, मुदखेड कोविड केअर सेंटर 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर 3, बिलोली कोविड केअर सेंटर 19, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 124, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 921, खाजगी रुग्णालय 281 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 98, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 82, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 12 हजार 130

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 13 हजार 954

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 896

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 897

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 845

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-236

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 725

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-63

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...