Saturday, July 22, 2017

पुरवठा निरीक्षक परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
            नांदेड, दि. 22 :- अन्न नागरी विभाग अमरावती व नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रविवार 23 जुलै 2017 रोजी नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील दोन परीक्षा  केंद्रात दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू  केल्याचे   जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दुपारी 1 ते सायं. 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

000000
क्रीडा योजनेसाठी अर्ज करण्यास  
31 जुलै पर्यंत मुदतवाढ
             नांदेड, दि. 22 :- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने सन 2017-18 या वर्षात सामाजिक सेवा शिबीर घेणे, ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवी युवक मंडळाना आर्थिक सहाय्य (सर्वसाधारण, विशेष घटक, आदिवासी) योजना  व क्रीडांगण विकास योजना (विशेष घटक, आदिवासी व ओटीएसपी) या योजनांचे अर्ज करण्यासाठी सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
             या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्षात कार्यालयीन वेळेत वाटप व स्विकारले जाणार आहेत. अर्जाची मागणी करताना संस्थेचे दोन्ही नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत सादर करावी. जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळे, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, ग्रामपंचायत व स्थानीक स्वराज्य संस्था, एनजीओ समिती पदाधिकाऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.

0000000
रास्तभाव धान्य दुकानात
ऑगस्ट महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 22 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने ऑगस्ट 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. ऑगस्ट 2017 महिन्‍यात जिल्‍हयासाठी 781.73 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.   
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड व लोहा- 64.68 , हदगाव- 68, किनवट- 153.5, भोकर- 37.5, बिलोली- 56.5, देगलूर- 49.5, मुखेड- 67, कंधार- 43.5, लोहा- 35.5, अर्धापूर- 15, हिमायतनगर- 33, माहूर- 65.5, उमरी- 28.5, धर्माबाद-25.5, नायगाव- 49.5, मुदखेड- 16.5. याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000
कर कपात (टीडीएस) बाबत
बचत भवन येथे 26 जुलैला कार्यशाळा  
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन  
नांदेड, दि. 22 :-  वस्तु व सेवाकर अधिनियमांतर्गत कर कपात (टीडीएस) बाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 26 जुलै 2017 रोजी बचत भवन येथे दोन सत्रात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.  
नांदेड मुख्यालय व नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर नांदेड वगळता  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेस वेळेनुसार उपस्थित रहावे, असेही आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांना वस्तु व सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नोंदणी न करता जे आहरण व संवितरण अधिकारी स्त्रोत ठिकाणी कर कपात (टीडीएस) भरणा करणार नाहीत त्यांना 10 हजार रुपये किंवा कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल ती दंड लावण्याची तरतुद आहे.
या कायदातील टीडीएसबाबत संबंधी परिपुर्ण माहिती देण्यासाठी राज्यकर उपआयुक्त सौ. रंजना देशमुख या मार्गदर्शन करणार आहेत. सहायक राज्यकर आयुक्त विकास वैद्य व राज्यकर अधिकारी अविनाश चव्हाण हे शंकाचे निरसन करणार आहेत. यावेळी राज्यकर सहआयुक्त व जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

0000000
जिल्हा उद्योग केंद्राच्या सभांचे
28 जुलै रोजी आयोजन
           नांदेड, दि. 22 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुर्नजीवन जिल्हास्तरीय समिती सभा शुक्रवार 28 जुलै 2017 रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव तालुक्यातील मे. इंडिया मेगा ॲग्रो अनाज लि. डी-3 एमआयडीसी कृष्णुर येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.     

000000
संजय गांधी निराधार अनुदान
योजना समितीची 28 जुलैला बैठक
           नांदेड, दि. 22 :- नांदेड शहर महानगरपालिका हद्दीतील ( संगायो / इंगायो / श्राबायो ) या विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक समितीचे अध्यक्ष जम्मूसिंह ठाकूर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शुक्रवार 28 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वा. आयोजित केली आहे. सर्व अर्जदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार संजय गांधी निराधार योजना शहर नांदेड यांनी केले आहे.

00000000
उच्च शिक्षण विभागांतर्गत  
  29 जुलैला शिष्यवृत्ती कार्यशाळा    
           नांदेड, दि. 22 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उच्च शिक्षण नांदेड विभागांतर्गत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ कला वाणिज्य, विज्ञान अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत  महाविद्यालयातील  संगणक हाताळणारे कर्मचारी तसेच ईबीसी शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी  शनिवार 29 जुलै 2017 रोजी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाची ग्रंथालय इमारत येथे सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत शिष्यवृत्तीबाबत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. महाविद्यालय प्राचार्य व संस्था प्रमुखांनी कार्यशाळेस संबंधीत कर्मचाऱ्यांना पाठवावे, असे आवाहन सहासंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.  
            आपले सरकार पोर्टलद्वारे MahaDBT शिष्यवृत्ती योजना सन 2017-18 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अल्पसंख्याक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती (मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, जैन ) व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ईबीसीधारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी माहिती देण्यासाठी उच्च शिक्षण नांदेड विभागांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  

0000000
सहकारी कायदा बदल समितीची
30 जुलैला लातूर येथे सभा ;
 सहकारी संस्थांना उपस्थितीचे आवाहन
           नांदेड, दि. 22 :-  महाराष्ट्र सहकारी कायदा बदल समितीची लातूर प्रशासकीय विभागाची सभा लातूर विभागातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या चार जिल्ह्यासाठी रविवार 30 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वा. कै. दगडोजीराव देशमुख सभागृह, उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा बदल समितीचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
            नांदेड जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांचे सहकार कायदा बदलाबाबत अथवा दुरुस्तीबाबत निवेदन असतील तर लेखी स्वरुपात महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद पुणे किंवा सभास्थळी दयावीत. या सभेस जास्तीतजास्त सहकारी संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.        
            राज्य सहकारी परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा बदल समितीची नेमणुक करण्यात आली आहे. या समितीची सभा राज्यातील सर्व सहकारी प्रशासकीय विभागामध्ये आयोजित करण्यात आली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
हरितगृह, शेडनेटगृहासाठी शेतकऱ्यांनी
20 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी
   नांदेड, दि. 22 :- हरीतगृह, शेडनेटगृह प्लास्टीक आच्छादन या योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार 20 ऑगस्ट 2017 पर्यंत शेतकरी लाभार्थ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन स्कीम फाईल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.   
नांदेड जिल्ह्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2017-18 मध्ये संरक्षित प्रकल्पासाठी 240 लाख रुपयाचा आराखडा मंजुर झाला आहे. यामध्ये अनुसुचीत जातीसाठी 35 लाख 77 हजार रुपये, अनुसुचीत जमातीसाठी 18 लाख 32 हजार सर्वसाधारणसाठी 185 लाख 91 हजार रुपये अनुदान असा आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत हरीतगृह, शेडनेटगृह प्लास्टीक आच्छादन याबाबींचा समावेश आहे.
जिल्हा अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती बैठकीत प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहुन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण येत असेल तर आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या अधीक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असेही आवाहन डॉ. मोटे यांनी केले आहे.

00000000
अकरावी व्यवसायिक प्रशिक्षण
अभ्यासक्रमासाठी देगलूर येथे प्रवेश सुरु
नांदेड दि. 22 :- देगलूर शासकीय तंत्र प्रशाला केंद्र संचलित इयत्ता 11 वीसाठी व्यवसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना (एचएससी व्होकेशनल) प्रवेश सुरु असल्याचे मुख्याध्यापक शासकीय तंत्र प्रशाला केंद्र देगलूर यांनी कळविले आहे.

या प्रशाला केंद्रात चालवण्यात येणाऱ्या  व्यवसाय अभ्यासक्रमात ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी (द्विलक्षी) यांचा समावेश असून प्रत्येकी 20 जागा तर इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी (द्विलक्षी) 50 जागेची प्रवेश क्षमता असणाऱ्या या अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. प्रवेशासाठी अर्जाचा नमुना कार्यालयीने वेळेत मिळेल. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाईल. मागासवर्गीय, अपंग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे शिष्यवृत्ती मिळेल. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी  शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय केंद्र रामपुर रोड देगलूर (दुरध्वनी क्र. 02463- 255128 ) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.                
                                           0000000
मदर युनीटधारक निवडीसाठी
अर्ज करण्याचे पशुसंवर्धनचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- आदिवासी ग्रामीण भागात परसातील कुक्कुट पालनाद्वारे अंगणवाड्यांमधील मुलांच्या आहारामधून अंडी पुरवठा करण्यासाठी व स्वयंरोजगार निर्मितीसाठी "स्वयंम प्रकल्प" किनवट व माहूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मदर युनीट लाभार्थी निवडीसाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त तथा सदस्य सचिव स्वयम प्रकल्प नांदेड यांनी केले आहे.   
मदर युनीट लाभार्थी निवडीसाठी निकष पुढील प्रमाणे राहतील. युनिटधारक हा स्थानीक आदिवासी असावा. शासकीय सधन विकास कुक्कुटगट, नव्याने स्थापीत होणारे खाजगी भागीदारी तत्वावरील सधन विकास कुक्कुटगट, कृषि विज्ञान केंद्र यांच्यामधून करण्यात येणार आहे. अपवादात्मक वेळी आदिवासी प्रवर्गातून मदर युनीटधारक न मिळाल्यास इतर प्रवर्गातून त्यांची निवड करण्यात येईल. मदर युनीट धारकास कुक्कुट पालन व्यवसाचा अनुभव, पक्षी संगोपनाची सुविधा, पक्षीगृह असलेला आणि निवडलेल्या लाभधारकाच्या गावाजवळील असावा. मदर युनीट धारकांची निवड ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प समन्वय समितीमार्फत करण्यात येणार आहे.
निवडलेल्या मदर युनीट धारकाला 1 लाख 50 हजार रुपये युनीट स्थापनेसाठी उभारावे लागतील. यापैकी 60 हजार रुपयाचे अनुदान देय राहील. मदर युनीटमध्ये एक दिवसीय पिल्लांचे चार आठवड्यापर्यंत संगोपन करुन निवडलेल्या लाभार्थ्यांना पक्षांचे वाटप तीन टप्प्यात ( 20 / 15 / 10 एकूण 45 पक्षी ) करण्यात येणार आहे. प्रती पक्षी मदर युनीट धारकास 55 रुपये, 58 रुपये 60 रुपये याप्रमाणे पक्षांची खरेदी किंमत अदा करण्यात येणार आहे.  या योजनेचे अंमलबजावणी क्षेत्र प्रकल्प कार्यालय एकात्मीक आदिवासी विकास विभाग यांच्याकडून निश्चित करुन एक मदर युनीट स्थापन करण्यात येणार आहे. मदर युनीटमार्फत  चार आठवड्याचे पक्षी निवडलेल्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यात प्रती लाभार्थी 45 पक्षी प्रमाणे वाटप करण्यात येतील.  
स्वयम प्रकल्प अंतर्गत मदर युनीट स्थापनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती किनवट व माहूर यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त केले आहे.  
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...