Saturday, July 22, 2017

सहकारी कायदा बदल समितीची
30 जुलैला लातूर येथे सभा ;
 सहकारी संस्थांना उपस्थितीचे आवाहन
           नांदेड, दि. 22 :-  महाराष्ट्र सहकारी कायदा बदल समितीची लातूर प्रशासकीय विभागाची सभा लातूर विभागातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या चार जिल्ह्यासाठी रविवार 30 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वा. कै. दगडोजीराव देशमुख सभागृह, उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा बदल समितीचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
            नांदेड जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांचे सहकार कायदा बदलाबाबत अथवा दुरुस्तीबाबत निवेदन असतील तर लेखी स्वरुपात महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद पुणे किंवा सभास्थळी दयावीत. या सभेस जास्तीतजास्त सहकारी संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.        
            राज्य सहकारी परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा बदल समितीची नेमणुक करण्यात आली आहे. या समितीची सभा राज्यातील सर्व सहकारी प्रशासकीय विभागामध्ये आयोजित करण्यात आली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...