“ मानव सेवा हीच, माधव सेवा ”
वैद्यकीय क्षेत्र सेवा प्रदान करण्याचा सर्वोत्तम माध्यम
-
पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 26 :- “मानव सेवा हीच, माधव सेवा आहे ” वैद्यकीय क्षेत्र सेवा प्रदान
करण्याचा सर्वोत्तम माध्यम आहे. लोकांना
निरोगी जीवन जगण्यास मदत करणाऱ्या वैद्यकीय सेवेला बळकट करण्यासाठी शासन
सर्वोत्परीने सहाय्य करण्यास कटीबध्द आहे, असे राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी
प्रतिपादन केले.
येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, शोभा
नगर, नांदेड कै. शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबीर
व वाचनालयाचे उद्घाटन तसेच पोर्णिमानगर येथील स्थलांतरित आरोग्य केंद्राच्या
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी महापौर
दीक्षा धबाले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार डी. पी. सावंत, स्थायी
समितीचे सभापती अमिर तेहरा,माजी महापौर शैलेजा स्वामी, माजी आमदार वसंत चव्हाण, माजी
आमदार हनुमंतराव बेटमोगरीकर, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, नगरसेविका प्रकाश कौर खालसा, नगरसेवक किशोर
स्वामी, उन्मेश पवळे, शैलेजा स्वामी,
अजितपालसिंघ संधू, आनंद पवळे, विरेंद्र गाडीवाले, आदी मान्यवर पदाधिकारी,
अधिकारी, नागरिक आदिंची उपस्थिती होती .
पालकमंत्री
श्री. चव्हाण म्हणाले की, नांदेडचा नावलौकीक आता येथील उत्कृष्ट शिक्षणामुळे राज्यभर
होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध
असणाऱ्या अभ्यासिकेसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आपलं शहर सुंदर
असायला हवे. शहरात होर्डींग विनापरवानगी लावण्यात येवू नयेत. रितसर मार्गाने परवानगी
घेवूनच होर्डींग लावावेत. जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात
त्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित असलेली विकासात्मक कामे पूर्ण करण्याचा शासनाचा मानस
आहे. जनतेच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून समान्य माणसाला मदत
करण्याच्या हेतूने शासन कार्य करणार आहे.
नांदेड शहर
महानगरपालिकेच्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनी , नांदेड येथील डॉ. राम मनोहर लोहिया
ग्रंथालय, स्थलांतरित प्राथमिक आरोग्य केद्राचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण
यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आरोग्य केंद्राची
पाहणी केली व माहिती घेतली. व उपस्थित अधिकाऱ्यांना मौलीक सुचनाही दिल्या.
या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर
शैलेजा स्वामी यांनी केले. तर आभार आनंदराव चव्हाण यांनी मानले.
00000