Monday, January 27, 2020


शहरी महानेट प्रकल्पाच्या चरणास प्रारंभ
शहरी सर्व शासकीय कार्यालयांना मिळेल उच्च प्रतीची इंटरनेट जोडणी
            नांदेड, दि. 27 :- केंद्र सरकारच्या भारतनेट शहरी महानेट प्रकल्पाचे महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांचेमार्फत राबविण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे नांदेड जिल्ह्यातील सर्व शहरी शासकीय कार्यालयांना उच्च प्रतीची इंटरनेट जोडणी करण्यात येणार आहे. ऑप्टीकल फायबर नेटवर्क जोडले जाणार आहेत.  
            नागरिकांनी डिजिटल सेवा देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे हा उपक्रम सुरु केला आहे. हे काम जिल्ह्यात पूर्ण करण्यासाठी शासनाद्वारे रिलायन्स जिओ या कंपनीची निवड केलेली आहे.
            या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच महानेट जिल्हा टिम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक कपित पेंडलवार यांनी केले. आभार वरिष्ठ नेटवर्क अभियंता ज्ञानेश्वर राजणे यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...