Sunday, May 7, 2017


नांदेडमधील पहिली "नीट" परीक्षा सुरळीत संपन्न
13 हजार 668 विद्यार्थ्यांची उपस्थिती  

नांदेड दि. 6 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) 2017 आज सुरळीत पार पडली. नांदेड केंद्रातर्गत या वर्षी पहिल्यांदाच परीक्षा झाली. नांदेड शहरात 34 आणि मुदखेड येथील एक अशी एकूण 35 परीक्षा उपकेंद्र निश्चित करण्यात आली होती. परीक्षेसाठी सुमारे 13 हजार 668 विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह, यंत्रणेतील सर्वच घटकांनी सहकार्य केल्याचे परीक्षा संयोजनाची जबाबदारी असलेल्या होरायझन डिस्कव्हरी ॲकडमीच्यावतीने सांगण्यात आले.
परीक्षा समन्वयक म्हणून ॲकडमीचे प्राचार्य फनींद्र बोरा तसेच नीटचे अधिकारी एस.आय. उस्ताद, होरायजन ॲकडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. सिरसाट यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम पाहिले. होरायझनचे डिस्कव्हरी ॲकडमीचे अध्यक्ष व्ही. व्ही. चारी, सचिव संजय रुईकर यांनीही परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रयत्न केले.
नांदेड केंद्रांतर्गत या परीक्षेसाठी सुमारे 13 हजार 773 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 13 हजार 668 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहीले. परीक्षेसाठी प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त, परीक्षा साहित्याच्या सुरक्षेसाठी तसेच तिच्या वाहतुकीसाठी पुरेश्या सुविधा पुरविण्यात आल्या. त्याशिवाय अत्यावश्यक बाब म्हणून आरोग्य पथके, परीक्षा कालावधीत अखंडीत वीज पुरवठा राहील यासाठीचे नियोजन, वाहतुकीसाठी पुरेशा शहर वाहतूक बस, परीक्षा केंद्रांवरील पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबत काटेकोर नियोजन करण्यात आले. नांदेड केंद्र म्हणून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनीही पालक, विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रयत्न केले.

या परीक्षेचा निकाल गुरुवार 8 जून 2017 रोजी जाहीर होणार असल्याचे सीबीएसईच्या वेळापत्रकात म्हटले आहे. 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...