Friday, January 10, 2025

 वृत्त क्रमांक 38 

उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन

 

नांदेड दि. 10 जानेवारी :- उमरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रविवार 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच उद्योजकांचे मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. माजी प्रशिक्षणार्थी, नियमित प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक यांनी या उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 37

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन

नांदेड दि. 10 जानेवारी :-  स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. व्ही सुर्यवंशी यांनी केले आहे.


यात विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, क्रीडा स्पर्धा इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्राची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना व्हावी यासाठी प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदाची जयंती असल्यामुळे हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. युवक हे देशाचे भविष्य व आधारस्तंभ आहेत. स्वामी विवेकानंद हे भारताचे महान आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले आयुष्य युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी तसेच त्यांचे विचार आणि आदर्श आजदेखील लाखो युवकांना मार्गदर्शक आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 36

21 जानेवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 10 जानेवारी :-  नांदेड जिल्ह¬Éतील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा शासकीय तंत्र प्रशाला केंद्रआनंदनगर रोडबाबानगर नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक व इतर आस्थापनांच्या वतीने मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह¬Éतील बेरोजगार उमेदवारांनी 21 जानेवारी 2025 रोजी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोडबाबानगर नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

000000

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...