Tuesday, June 9, 2020

वृत्त क्र. 535



जिल्हा परिषदेची सोमवारी सर्वसाधारण सभा
नांदेड (जिमाका) दि. 9 :-  नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार 15 जून 2020 रोजी दुपारी 1 वा. व्हिडीओ कॉन्फरन्स गुगल मीट (Video Conference Google Meet) या ॲपद्वारे व जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 524


महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 च्या
नियम 11 मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना प्रसिद्ध
सूचना, हरकती सादर करण्याचे आवाहन  
नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि. 14 फेब्रुवारी 2020 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 11 मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नियमांचा मसुदा
या नियमांना, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम, 2020 असे म्हणावे. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम, 11 च्या पोट-नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात, रुपये 35,000 या मजकुराऐवजी रुपये 8,00,000 हा मजकूर दाखल करण्यात येईल.
या सुधारणेच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी त्या, या कार्यालयास सादर कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...