Wednesday, December 23, 2020

 33 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू  

36 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 33 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 983 अहवालापैकी 946 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 182 एवढी झाली असून यातील 20 हजार 111 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 308 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 23 डिसेंबर रोजी नांदेड तालुक्यातील नरहरनगर पावडेवाडी येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 566 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, कंधार तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 9 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.94 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 11, किनवट तालुक्यात 1, हदगाव 1, मुदखेड 1 असे एकुण 14 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, देगलूर तालुक्यात 1, बिलोली 1, हिमायतनगर 2, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 5, नायगाव 1 असे एकुण 19 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 308 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 14, देगलूर कोविड रुग्णालय 23, हदगाव कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 155, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 32, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 16 आहेत.   

बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 71 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 73 हजार 249

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 47 हजार 963

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 182

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 111

एकुण मृत्यू संख्या-566

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.94 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-497

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-308

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.          

000000

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

शिकाऊ उमेदवारांसाठी 56 प्रशिक्षणार्थी

पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड येथे सन 2020-21 या  सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकुण  56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 या पदांचा समावेश आहे.   

आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org व अभियांत्रिकी पदवीधर/पदवीकाधारक उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचा  विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करावा. कार्यालयाचे छापील नमुन्यातील अर्ज भरुन देण्याची मुदत बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत आहे. हा छापील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जाची किंमत (जीएसटी 18 टक्के सहीत) खुल्या प्रर्वगाकरिता 590 रुपये तर मागासवर्गीयासाठी 295 रुपये आहे, अशी माहिती राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका

क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमिवर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार एका आदेशाद्वारे लागू केली आहे. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश 31 ऑक्टोंबर 2020 व 4,15 व 28 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू राहणार आहेत. 

या आदेशाची अंमलबजावणी करणारे सर्व अधिकारी यांनी आदेशातील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई  करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतून केलेल्या कृत्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे.

0000

 

 

कोविड-19 परिस्थितीमुळे

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विविध प्रदर्शन, कार्यक्रमाचे आयोजन रद्द 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. या निर्गमीत मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीने भरवण्यात येणारे विविध विभागाचे स्टॉल, कृषि प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटांच्या वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. याची शेतकरी, पशुपालक, भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले आहे. 

 जिल्ह्यात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची देवस्वारी (पालखी सोहळा) सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. येथून 4 दिवस माळेगाव यात्रा महोत्सव भरविला जातो परंतु सध्या कोविड-19, शासन अधिसूचना 21 सप्टेंबर 2020 नुसार व जनावरात होणारा लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी यात्रेत भरविण्यात येणारे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...