Wednesday, December 23, 2020

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

शिकाऊ उमेदवारांसाठी 56 प्रशिक्षणार्थी

पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड येथे सन 2020-21 या  सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकुण  56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 या पदांचा समावेश आहे.   

आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org व अभियांत्रिकी पदवीधर/पदवीकाधारक उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचा  विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करावा. कार्यालयाचे छापील नमुन्यातील अर्ज भरुन देण्याची मुदत बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत आहे. हा छापील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जाची किंमत (जीएसटी 18 टक्के सहीत) खुल्या प्रर्वगाकरिता 590 रुपये तर मागासवर्गीयासाठी 295 रुपये आहे, अशी माहिती राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...