Monday, August 22, 2022

 मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागतनगरमालेगाव रोड नांदेड येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिकउच्च माध्यमिकपदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना नुतन प्रवेशासाठी 30 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे. 

 

अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रकसन 2021-22 या वर्षाचे तहसिलदार कार्यालयाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्ररहिवासी प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 22 ते 30 ऑगस्ट 2022 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील.

 

विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही, असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

0000

 दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- दिव्यांग व्यक्तींना सन 2021-22 चे राष्ट्रीय पुरस्कार हा केंद्र शासनाच्या योजनेच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.awards.gov.in  या संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्तींकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन अर्ज रविवार 28 ऑगस्ट 2022 पर्यंत मागविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांनी केले आहे.

 

दिनांक 28 ऑगस्ट 2022 पूर्वी पुरस्कार सन 2021 व 2022 साठी प्राप्त सर्व अर्ज / नामांकन विचारात घेतील जाणार आहेत. सन 2021 आणि सन 2022 साठी स्वतंत्ररित्या अर्ज / नामांकन केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL www.award.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जात सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याचा सविस्तर वर्णनासह भरावी. सक्षम अथवा पोष्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील www.disibilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाच्या तीन प्रती हार्ड कॉपी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयात विहित मुदतीत सादर कराव्यात, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे.

0000

 बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप 

·  प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत


नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्हयातील बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडील शासन निर्णय 11 डिसेंबर 2015 नुसार जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडे नोंदणी प्रमाणपत्र अद्यावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्ययावत आहे अशा संस्थांनी पुढील कामाबाबत आपले प्रस्ताव मंगळवार 30 ऑगस्ट 2022 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड या कार्यालयात सादर करावी.

 

त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प विभाग देगलूर अंतर्गत लेंडी प्रकल्प उपविभाग क्र. 1 ईटग्याळ या कार्यालयाकडील एमएच 26 आर 121 या निरिक्षण वाहनासाठी नोंदणीकृत वाहन चालक कामगार सहकारी संस्थांची अकरा महिन्यांसाठी एलएमव्ही वाहन चालकाची सेवा पुरविण्याकरिता शिफारस करण्याबाबत (एलएमव्ही वाहन चालकाची संख्या 1) अंदाजपत्रकिय किंमत 1 लाख 73 हजार 413 रुपये व लेंडी प्रकल्प विभाग देगलूर अंतर्गत लेंडी प्रकल्प उपविभाग लघु पाटबंधारे या कार्यालयाकडील एमएच 11 जी 5876 या निरीक्षण वाहनासाठी नोंदणीकृत वाहन चालक कामगार सहकारी संस्थांची 11 महिन्यासाठी एलएमव्ही वाहन चालकाची सेवा पुरविण्यासाठी शिफारस करण्याबाबत. एलएमव्ही वाहन चालकाची संख्या 1 अंदाजपत्रकिय किंमत 1 लाख 43 हजार 413 रुपये याप्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे.

 

प्रस्तावासोबत संस्थेचे अद्यावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे ऑडिट रिपोर्ट सन 2021-22, बॅंकेचे स्टेटमेंट ही कागदपत्रे जोडावी लागतील. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

0000

 कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह (डिस्चार्ज बुकची प्रत, आर्मी व सिव्हिल हेव्ही व्हेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी) उपस्थितीत रहावे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता

सैन्य दलातील ट्रेड DSV (Spl Veh)/ AM-50/ Dvr/ Dvr (MT)/ DMT/ Dvr GNR/ Dvr (AFT) यापैकी असावा. दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे. वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSVBUS (TRV-PSV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या / नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा. सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मेडिकल कॅटेगरी SHAPE-I. वयोमर्यादा 48 वर्षे आहे. माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय41, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाहीजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक 24 ते 25 ऑगस्ट 2022 रोजी महास्वयंम या संकेतस्थळावरून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीतजास्त ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून आय Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव,  शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल.

 

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेलकंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधावा, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...