दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारासाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 22 :- दिव्यांग व्यक्तींना सन 2021-22 चे राष्ट्रीय पुरस्कार हा केंद्र शासनाच्या योजनेच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.awards.gov.in या संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्तींकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन अर्ज रविवार 28 ऑगस्ट 2022 पर्यंत मागविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांनी केले आहे.
दिनांक 28 ऑगस्ट 2022 पूर्वी पुरस्कार सन 2021 व 2022 साठी प्राप्त सर्व अर्ज / नामांकन विचारात घेतील जाणार आहेत. सन 2021 आणि सन 2022 साठी स्वतंत्ररित्या अर्ज / नामांकन केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL www.award.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जात सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याचा सविस्तर वर्णनासह भरावी. सक्षम अथवा पोष्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील www.disibilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाच्या तीन प्रती हार्ड कॉपी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयात विहित मुदतीत सादर कराव्यात, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment