Sunday, August 20, 2017

जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 100.86 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 43.92 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात रविवार 20 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 100.86 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 1613.78  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 419.69 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 43.92 टक्के एवढा पाऊस झाला आहे.  
जिल्ह्यात रविवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 144.00 (624.47), मुदखेड- 199.00 (590.49), अर्धापूर- 122.67 (455.34), भोकर- 99.00 (443.25), उमरी- 130.33 (394.98), कंधार- 85.83 (399.66), लोहा- 98.33 (402.98), किनवट- 39.00 (416.32), माहूर- 30.50 (363.64), हदगाव- 60.71 (445.59), हिमायतनगर- 53.00 (320.46), देगलूर- 65.83 (249.98), बिलोली- 108.00 (395.80), धर्माबाद- 126.67 (419.36), नायगाव- 134.20 (404.66), मुखेड- 116.71 (387.99) आज अखेर पावसाची सरासरी 419.69 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6714.97) मिलीमीटर आहे.

00000
पावसामुळे झालेला जीवीत,
वित्तहानीचा प्राथमिक अहवाल सादर
नांदेड, दि. 20 :- जिल्‍हयात शनिवार 19 व रविवार 20 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंत पावसामुळे झालेला जीवीत व वित्‍तहानीबाबतचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल संबंधीत तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केला आहे.      
हा प्राथमिक नजर अंदाज अहवाल पुढील प्रमाणे आहे. रविवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. शुभम ऊर्फ तानाजी भगवान शिंदे (वय 12 वर्ष) रा. पांडूरंगनगर ता. नांदेड हा गल्‍लीतील नाल्‍याला आलेल्‍या पुरात वाहून उपचारा दरम्‍यान रुग्‍णालयात मयत झाला आहे. मुदखेड तालुक्यातील मौ. पांगरगाव येथील संभाजी जगन्‍नाथ तळने (वय 28 वर्षे) हा पांगरगांव शिवारात नाल्‍याच्‍या पुरात वाहून मयत झाला आहे. नांदेड तालुक्यातील मौ. बोरगाव येथे चार शेळीचे पिल्‍ले मयत झाल्‍या आहेत. लोहा तालुक्यातील मौ. पिंपळगाव येथील साहेब येवले यांची एक गाय, वासरु, गोर व एक कुत्र इत्यादी जनावरे तसेच मौ. टेकळी येथील गंगाधर घोरबांड यांची एक गाय वीज पडून मयत झाली आहे. मुखेड तालुक्यातील मौ. जांब बु. येथील विठ्ठल केंद्रे यांच्या 2 मेंढया वीजेच्‍या झटक्‍याने मयत झाल्‍या आहेत. नांदेड व बिलोली तालुक्‍यातील काही घरांमध्‍ये पाणी शिरुन अंशत घराची पडझड झाली  आहे.

000000
अतिवृष्‍टीच्या प्रसंगी नागरिकांनी
सावधगिरी बाळगावी ; जिल्हा प्रशासाचे आवाहन 
नांदेड दि. 20 :- विदर्भ, उत्‍तर महाराष्ट्र, कोकण, मध्‍य महाराष्ट्रासह मराठवाडयात काही ठिकाणी 24 ऑगस्ट 2017 पर्यंत अतिवृष्‍टी होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खात्यानी दिली आहे. जिल्‍हयात नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसेच नदीकाठाच्‍या गावांनी सावधानता ठेवावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या कालावधीत वादळी विजा कोसळण्‍याची शक्‍यता आहे. नागरीकांनी झाडाच्‍या आसऱ्याला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अतिवृष्‍टीच्‍या काळात पावसाळी पाण्‍याचा येवा वाढत राहिल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा विसर्ग करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे नागरीक, विद्यार्थ्यांनी पाण्‍याच्या स्‍त्रोतापासुन दुर राहावे. नदीकाठच्‍या गावांना अतिसावधतेचा इशारा देण्‍यात आला आहे. आपतकालीन प्रसंग उदभवल्‍यास नागरिकांनी सतर्क रहावे. याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्या वरीष्‍ठ कार्यालयास त्वरीत माहिती दयावी. आपतकालीन दुरध्‍वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. जिल्‍हा पुर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड 02462 - 263870, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नियंत्रण कक्ष 02462 - 234461, जिल्‍हा पोलिस नियंत्रण कक्ष 02462 - 234720 जिल्‍हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02462- 235077, फॅक्‍स 238500 टोल फ्री 1077, अग्निशमन विभाग 02462- 252555 या दुरध्वनी नंबरवर संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...