Sunday, August 20, 2017

पावसामुळे झालेला जीवीत,
वित्तहानीचा प्राथमिक अहवाल सादर
नांदेड, दि. 20 :- जिल्‍हयात शनिवार 19 व रविवार 20 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंत पावसामुळे झालेला जीवीत व वित्‍तहानीबाबतचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल संबंधीत तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केला आहे.      
हा प्राथमिक नजर अंदाज अहवाल पुढील प्रमाणे आहे. रविवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. शुभम ऊर्फ तानाजी भगवान शिंदे (वय 12 वर्ष) रा. पांडूरंगनगर ता. नांदेड हा गल्‍लीतील नाल्‍याला आलेल्‍या पुरात वाहून उपचारा दरम्‍यान रुग्‍णालयात मयत झाला आहे. मुदखेड तालुक्यातील मौ. पांगरगाव येथील संभाजी जगन्‍नाथ तळने (वय 28 वर्षे) हा पांगरगांव शिवारात नाल्‍याच्‍या पुरात वाहून मयत झाला आहे. नांदेड तालुक्यातील मौ. बोरगाव येथे चार शेळीचे पिल्‍ले मयत झाल्‍या आहेत. लोहा तालुक्यातील मौ. पिंपळगाव येथील साहेब येवले यांची एक गाय, वासरु, गोर व एक कुत्र इत्यादी जनावरे तसेच मौ. टेकळी येथील गंगाधर घोरबांड यांची एक गाय वीज पडून मयत झाली आहे. मुखेड तालुक्यातील मौ. जांब बु. येथील विठ्ठल केंद्रे यांच्या 2 मेंढया वीजेच्‍या झटक्‍याने मयत झाल्‍या आहेत. नांदेड व बिलोली तालुक्‍यातील काही घरांमध्‍ये पाणी शिरुन अंशत घराची पडझड झाली  आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...