Saturday, April 11, 2020

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी
माजी सैनिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे
नांदेड दि. 11 :- कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन मोहिमेत सैन्य सेवेचा प्रदिर्घ अनुभव असलेले विविध पदावर सेवा केलेल्या व निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की,  या मोहिमेत स्वइच्छेने सहभाग नोंदवावा,  असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  नांदेड यांनी केले आहे.  
कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादूर्भाव रोखण्याच्या शासनाच्या मोहिमेत सहभागी होणेसाठी मा .मुख्यमंत्री महोदयांनी माजी सैनिकांना सहभाग घेण्यासाठी आवाहन केलेले  आहे.   त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी  निर्देशित केल्याप्रमाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड हे जिल्हयातील इच्छूक माजी सैनिकांची यादी तयार करत आहे.   
सैन्य सेवेचा प्रदिर्घ अनुभव असलेले विविध पदावर सेवा करून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की,  या मोहिमेत स्वेच्छेने सहभाग नोंदवावा.  प्रामुख्याने जे माजी सैनिक आर्मी मेडीकल कोर मधून निवृत्त झाले आहेत ज्यांना नर्सींग व पॅरामेडीकल सेवेचा तसेच रुग्णवाहिका चालविण्याचे अनुभव आहे त्यांनी  आपली सहमती द्यावी,  तसेच इतर  माजी  सैनिकांनीसुद्वा व्यवस्थापन व अनुशासनसाठी सेवा देणेसाठीचे पुढे येवून नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  माजी सैनिक हे 60 वर्षे खालील असोवेत व मेडीकल फिटनेस SHAPE1 असावे,   करिता जिल्हयातील सर्व माजी सैनिक संघटना व इच्छूक माजी सैनिकांनी मोबाईल क्रमांक 9403069447 (व्हॉटस ॲप) व मोबाईल क्रमांक  8379060837 वर यादी  ज्यामध्ये माजी सैनिकांचे पद, नाव, सध्या राहण्याचे ठिकाण, मोबाईल क्रमांक इत्यादी पाठवावे व दुरध्वनीद्वारे नावे नोंदवावी, असेही आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  नांदेड यांनी केले आहे.  

00000

विशेष लेख :-

लॉकडाऊनच्या काळात प्रशासनातील संवेदनशील अधिकाऱ्यांनी तिला मिळवून दिला निवारा...*उदयपूर ऐवजी नांदेडला पोहचली होती महिला..

नांदेड जिल्हा प्रशासनातील संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांच्या समयसूचकते मुळे एका परप्रांतीय मतिमंद असलेल्या महिलेला मिळाला हक्काचा निवारा. नुसता निवाराच नव्हे तर लॉकडाउन नंतर तिला तिचे हक्काचे घर मिळणार आहे. असे प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे,
कोरोना साथ रोगाच्या नियंत्रणासाठी जागोजागी पोलिसांनी चेक पोस्ट लावले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाचे रस्ते पोलिसांच्या व जिल्हा प्रशासनाच्या नजरेखाली आहेत. तणाव, सततची धाव पळ चालू असलेल्या या लॉकडाऊनच्या धामधुमीत नांदेड हैदराबाद रस्त्यावरील कुंटूर ते नायगाव या मार्गावर एक महिला अनवाणी फिरत असल्याचे कुंटूर पोलीस स्थानकाचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले व ही बाब वरिष्ठ स्तरावर कळवण्यासाठी नांदेड येथे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत देशपांडे यांना कळवले. देशपांडे यांनी त्यांच्या व्यस्ततेत देखील कसलाही विलंब न करता ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय कोणीही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात उपाशी व निवाऱ्या व्यतिरिक्त रहाता कामा नये असे तळमळीने काम करणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन व त्यांच्या टीम करीत आहे.त्याचा प्रत्यय येथेही या महिलेच्या निवारा आणि खाण्याची सोय केल्याने आला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, मीडिया सेलचे डॉ.दीपक शिंदे यांनी तातडीने लक्ष घातले.या नंतर हसीलदार नांदे यांच्याशी संपर्क केला आणि नायगाव न. पा चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना या महिलेची काळजी घेण्याच्यासंदर्भात सुचना दिल्या.
राजस्थान मधील उदयपूर येथील सबरुन निसाबेगम असे या 55 वर्षीय महिलेचे नाव असून नायगाव येथील कॅम्प मध्ये व नंतर आता समाज कल्याणच्या वसतिगृहात तिला निवारा व भोजन याची सोय करण्यात आली आहे. नायगाव चे पत्रकार चाऊस व वसतिगृहाचे चव्हाण हे तिच्या भोजन व इतर सुविधाची काळजी घेत आहेत. ही महिला चुकून नांदेड येथे आलेली आहे. उदयपूर येथील ही महिला अजमेर येथे दर्शन घेण्यासाठी गेली होती तेथे चुकून ती नांदेडला येणाऱ्या रेल्वेत बसली आणि सरळ नांदेड येथे आली. नांदेड येथून नायगाव पर्यंत कशी पोहचली हे तिला सांगता येत नाही परंतु तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या व ओळख पत्राच्या आधारावर तिची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले. अधिकाऱ्यां कडून या महिलेच्या नातेवाईकाकडे संपर्क केला जात असून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये असलेल्या इतर जिल्ह्यातील मजूर, कामगार तसेच नागरिक यांना निवारा, निवास व अन्न यांची सोय करण्याचा जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करत आहे. माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या साठी दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांची मदत घेतली जात आहे.
लॉकडाऊन च्या काळात या महिलेला निवारा तर मिळाला आहे परंतु नंतर तिला तिचं घर पाहायला मिळणार आहे. हे घडले ते केवळ सतर्क प्रशासन व माणुसकी मुळेच.
.......
**डॉ दीपक शिंदे
संचालक
माध्यम संकुल तथा सदस्य
मीडिया कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
लॉकडाऊन च्या काळात प्रशासनातील संवेदनशील अधिकाऱ्यांनी तिला मिळवून दिला  निवारा...
उदयपूर ऐवजी नांदेडला पोहचली होती महिला.. 
 
डॉ दीपक शिंदे 
संचालक 
माध्यम संकुल तथा सदस्य
मीडिया कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

आरोग्‍य विभागाच्‍या चार टिम व थर्मलगनद्वारे
तीन दिवसांच्या कालावधीत 3 हजार 755 भाविकांची तपासणी
नांदेड दि. 11 :- दिनांक 5 एप्रिल 2020 ते 7 एप्रिल 2020 या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुद्वारा लांगर साहिब नागिना घाट रोड येथील गुरूद्वारा मधील 3 हजार 755 भाविकांची नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 4 टिमद्वारे थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. तपासलेल्या सर्व भाविकांचे टेंपरेचर साधारण होते त्यांना कसलेही प्रकारचा ताप सर्दी खोकला नव्हता. या भाविकांचे लंगर साहेब येथील हा मोठ्या इमारतीमध्ये वास्तव्य आहे. त्यांना रूममध्ये क्वारन्टाईन मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत असे वैद्यकीय अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांनी कळविले आहे.
00000

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी
लिंकवर नोंद करून कापूस विक्री करावी 
नांदेड,दि.11 :- नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे याबाबतीत विचारणा केली होती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडील उपलब्ध कापूस विक्री करण्यासाठी एक लिंक तयार करुन देण्यात आली असून या लिंकचा वापर करुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध कापसाची नोंद या लिंकवर करावी. जेणेकरून कापूस संकलन केंद्रावर त्यांचा कापूस विक्रीसाठी स्विकारण्यात येईल.
सदर लिंकची माहिती तलाठी कृषी सहाय्यक या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना सरपंचांना पोलीस पाटील यांना व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आदेशित केले असून या लिंकवर नोंदणी केल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस विक्री करण्यासाठी सोयीचे होईल.  
कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नांदेड आणि नायगाव या कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही अशा पद्धतीने https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6Xeq1eUc228fwJ4kuw0A/viewform लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून या लिंकचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी या लिंकवर करायची आहे.
00000

उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालयात
ताप तपासणी केंद्र कार्यान्वित
नांदेड दि. 11 :-  नांदेड जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या अधिनस्‍त सर्व उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालय येथे जिल्‍ह्यात 17 ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्‍यात आलेले आहेत.
      जिल्‍हा रुग्‍णालय नांदेड,उपजिल्‍हा रुग्‍णालय, मुखेड, उपजिल्‍हा रुग्‍णालय, देगलूर, उपजिल्‍हा रुग्‍णालय, हदगाव, उपजिल्‍हा रुग्‍णालय, गोकुंदा तर ग्रामीण रुग्‍णालय भोकर, धर्माबाद, बिलोली, हिमायत नगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, बारड,मुदखेड, नायगाव, उमरी जिल्‍ह्यात 17 ठिकाणी ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्‍यात आली असल्‍याचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कार्यालय सामान्‍य रुग्‍णालय नांदेड यांनी कळविले आहे. 
000000

कोरोना चाचणीसाठी पाठवलेले 186 अहवाल प्राप्त
नांदेड दि. 11 :- कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या 196 नमुन्या यापैकी 186  जणांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील पाच जणांचे नमुने नकार झाले आहेत आणि पाच नमुन्यांचा तपासणी अहवाल अजून अप्राप्त आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत 332 रुग्णांना  क्वारंनटाईन केले होते. यातील 113 लोकांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून 191 लोकांना आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
000000

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आवाहन
नांदेड दि. 11 :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी माहिती दिली असून यामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, त्याचप्रमाणे दिव्यांग व गरिबाच्या जेवणाची सोय महानगरपालिकेच्या मार्फत देण्यात येणार असून अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांनी सकाळी सात ते अकरा या वेळेतच खरेदी करावी. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये त्याचप्रमाणे बँकेत गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स पाळून आपले सर्व व्यवहार करावेत. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सर्व नागरिकानी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
00000

 शेतकऱ्यांचा शिल्लक शेतीमाल
खरेदी करुन मोबदला दयावा
-         पालकमंत्री अशोक चव्हाण  
           
नांदेड दि. 11 :- शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेला शेतीमाल खरेदी केंद्रावर खरेदी करुन त्यांना वेळेत मोबदला दयावा. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने वैद्यकीय सुविधा व विविध विकास कामांबाबत चर्चा करुन उपयुक्त मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अनेकांचा रोजगार थांबला आहे. ही आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी काही प्रमाणात उद्योग, व्यवसाय, कृषिक्षेत्रातील रोजगार चालू ठेवता येतील का याचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करणार आहे. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्व श्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अनिल परब यांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपयोजनांवर चर्चा करतांना पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले, गरीबांना अन्नधान्य मिळाले पाहिजे यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा गरजूला अन्नधान्याचे वाटप करुन त्यांच्या जेवनाचा प्रश्न मिटवावा. सेवाभावी संस्थांकडून प्राप्त होणारे अन्नधान्य गरजू नागरिकांना स्थानिक स्तरावर नियमित वाटप करण्यात येत आहे. केदारनाथपिठाचे प्रमुख जगदगुरु श्री भीमाशंकरलिंगजी महाराज महास्वामीजी यांना नांदेड येथून उत्तराखंड राज्यातील केदारनाथ मंदिर येथे जाण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली असून आवश्यक कागदपत्रे पाठवून त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.   
नांदेड दक्षिण मतदारसंघातील गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळावे यासाठी आमदार मोहन हंबर्डे यांनी शंभर क्विंटल तांदूळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला. तसेच कोव्हीड 19 कोरोना साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मार्कण्डेय नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष सतीश राखेवार यांनी 71 हजार रुपयांचा तर लेबर कॉन्ट्रॉक्ट को. ऑ. सोसायटी फॉर्डेसन लि.च्यावतीने 51 हजार रुपये धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांचाकडे सुपूर्द करण्यात आला.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...