कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी
माजी सैनिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे
नांदेड दि. 11 :- कोरोना विषाणू (कोव्हिड-19)
चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन मोहिमेत सैन्य सेवेचा प्रदिर्घ
अनुभव असलेले विविध पदावर सेवा केलेल्या व निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना
आवाहन करण्यात येते की, या मोहिमेत स्वइच्छेने सहभाग
नोंदवावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादूर्भाव
रोखण्याच्या शासनाच्या मोहिमेत सहभागी होणेसाठी मा .मुख्यमंत्री महोदयांनी माजी
सैनिकांना सहभाग घेण्यासाठी आवाहन केलेले आहे. त्या
अनुषंगाने सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड हे जिल्हयातील इच्छूक माजी सैनिकांची यादी
तयार करत आहे.
सैन्य सेवेचा प्रदिर्घ अनुभव असलेले विविध
पदावर सेवा करून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की, या मोहिमेत स्वेच्छेने सहभाग
नोंदवावा. प्रामुख्याने जे माजी सैनिक आर्मी मेडीकल
कोर मधून निवृत्त झाले आहेत ज्यांना नर्सींग व पॅरामेडीकल सेवेचा तसेच रुग्णवाहिका
चालविण्याचे अनुभव आहे त्यांनी आपली सहमती द्यावी, तसेच इतर माजी सैनिकांनीसुद्वा व्यवस्थापन व
अनुशासनसाठी सेवा देणेसाठीचे पुढे येवून नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. माजी सैनिक हे 60 वर्षे खालील असोवेत व मेडीकल फिटनेस SHAPE1 असावे, करिता
जिल्हयातील सर्व माजी सैनिक संघटना व इच्छूक माजी सैनिकांनी मोबाईल क्रमांक 9403069447 (व्हॉटस ॲप) व
मोबाईल क्रमांक 8379060837 वर यादी ज्यामध्ये माजी सैनिकांचे पद, नाव, सध्या राहण्याचे ठिकाण, मोबाईल क्रमांक इत्यादी
पाठवावे व दुरध्वनीद्वारे नावे नोंदवावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment