Saturday, April 11, 2020


कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी
लिंकवर नोंद करून कापूस विक्री करावी 
नांदेड,दि.11 :- नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे याबाबतीत विचारणा केली होती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडील उपलब्ध कापूस विक्री करण्यासाठी एक लिंक तयार करुन देण्यात आली असून या लिंकचा वापर करुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध कापसाची नोंद या लिंकवर करावी. जेणेकरून कापूस संकलन केंद्रावर त्यांचा कापूस विक्रीसाठी स्विकारण्यात येईल.
सदर लिंकची माहिती तलाठी कृषी सहाय्यक या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना सरपंचांना पोलीस पाटील यांना व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आदेशित केले असून या लिंकवर नोंदणी केल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस विक्री करण्यासाठी सोयीचे होईल.  
कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नांदेड आणि नायगाव या कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही अशा पद्धतीने https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6Xeq1eUc228fwJ4kuw0A/viewform लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून या लिंकचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी या लिंकवर करायची आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...