Saturday, September 15, 2018


महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा 
नांदेड, दि. 15 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 16 सप्टेंबर 2018 रोजी परळी वैजनाथ जि. बीड येथून मोटारीने सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.50 वा. नांदेड विमानतळ येथून True Jet 2T 413 या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री केसरकर यांच्या हस्ते ध्वजवंद
नांदेड, दि. 15 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तत्पुर्वी सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.    
या समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000000


गृह (ग्रामिण) राज्यमंत्री दिपक केसरकर यांचा दौरा
नांदेड, दि. 15 :- राज्याचे गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग दिपक केसरकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 16  सप्टेंबर 2018 रोजी हैद्राबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे रात्री 11 वा. आगमन व राखीव.  
सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथून माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. कार्यक्रम स्थळी आगमन. सकाळी 8.31 वा. स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण. सकाळी 8.32 वा. शोकशस्त्र. सकाळी 8.33 वा. बाजू शस्त्र. सकाळी 9 वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सोईनुसार मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000000



आयटीआय शिकाऊ उमेदवारांचा भरती मेळावा
नांदेड, दि. 15 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे जुलै 2018 या सत्रात परिक्षेस बसलेल्या पण अद्याप निकाल अप्राप्त असलेल्या उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत निवड करण्यासाठी औद्योगिक आस्थापनेवर शिकाऊ उमेदवार भरती करण्यासाठी मंगळवार 25 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. केले आहे. संबंधीत उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथील सभागृहात उपस्थित रहावे. पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जी. जी. पाटनुरकर यांनी केले आहे.
000000


24 सप्टेंबर पासून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिम
घरोघरी येणाऱ्या तपासणी पथकाकडून तपासणी करुन घ्यावी
नांदेड, दि. 15 :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार प्रधानमंत्री प्रगती योजनेतून नांदेड जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. सर्वांनी या कालावधीत घरोघरी तपासणीसाठी येणाऱ्या पथकाकडून न चुकता तपासणी करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी एकही व्यक्ती तपासणीतून सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकुण 2 हजार 782 सर्वे करणाऱ्या टीम, 600 टीम पर्यवेक्षक, 32 तालुकास्तरीय पर्यवेक्षक, 32 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीममध्ये एक पुरुष व एक स्त्री स्वयंसेवक असणार आहे. यामध्ये आशा, अंगणवाडी ताई, नर्सिंगचे प्रशिक्षणार्थी मुले-मुली, महाविद्यालयातील मुले, युवक मंडळे, महिला मंडळे इत्यादीची मदत घेण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुन संशयीत रुग्ण शोधण्यात येणार आहे. या संशयीत रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर मार्फत करुन निदान निश्चित करुन उपचार करण्यात येणार आहेत.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जी. आ. अ. झीने मॅडम, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सविता चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अविनाश देशमुख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गजानन आईटवार, डॉ अमृत चव्हाण व सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे सर्वश्री मोटरगे, टाकळकर, गाजूलवार, पाटील व सर्व कुष्ठरोगतंत्रज्ञ हे मोहिम पूर्व प्रशिक्षण व नियोजन करीत आहेत, अशी माहिती नांदेडचे सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोगचे डॉ. जी. आर. आईटवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000



मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सोमवारी
विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ  
नांदेड, दि. 15 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. तसेच सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानंवदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
या समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्यादृष्टिने बॅग सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000000


स्वच्छता अभियानांतर्गत एनसीसी राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांनी नांदेड शहरात स्वच्छता जनजागृती रॅली काढून स्वच्छता केली. ( छाया : विजय होकर्णे नांदेड )


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...