Saturday, September 15, 2018


24 सप्टेंबर पासून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिम
घरोघरी येणाऱ्या तपासणी पथकाकडून तपासणी करुन घ्यावी
नांदेड, दि. 15 :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार प्रधानमंत्री प्रगती योजनेतून नांदेड जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. सर्वांनी या कालावधीत घरोघरी तपासणीसाठी येणाऱ्या पथकाकडून न चुकता तपासणी करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी एकही व्यक्ती तपासणीतून सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकुण 2 हजार 782 सर्वे करणाऱ्या टीम, 600 टीम पर्यवेक्षक, 32 तालुकास्तरीय पर्यवेक्षक, 32 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीममध्ये एक पुरुष व एक स्त्री स्वयंसेवक असणार आहे. यामध्ये आशा, अंगणवाडी ताई, नर्सिंगचे प्रशिक्षणार्थी मुले-मुली, महाविद्यालयातील मुले, युवक मंडळे, महिला मंडळे इत्यादीची मदत घेण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुन संशयीत रुग्ण शोधण्यात येणार आहे. या संशयीत रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर मार्फत करुन निदान निश्चित करुन उपचार करण्यात येणार आहेत.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जी. आ. अ. झीने मॅडम, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सविता चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अविनाश देशमुख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गजानन आईटवार, डॉ अमृत चव्हाण व सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे सर्वश्री मोटरगे, टाकळकर, गाजूलवार, पाटील व सर्व कुष्ठरोगतंत्रज्ञ हे मोहिम पूर्व प्रशिक्षण व नियोजन करीत आहेत, अशी माहिती नांदेडचे सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोगचे डॉ. जी. आर. आईटवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...