वाचन
प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन,
ई-बुकचे सामुहिक वाचन संपन्न
नांदेड,
दि. 15 :- वाचनाचा
हेतू ज्ञान मिळविण्यासाठी, अभ्यासासाठी, विरंगुळयासाठी,
मनोरंजनासाठी असा असला तरी
खरे वाचन स्वत:ला ओळखण्यासाठी
करावयाचे असून वाचन ही एक तपश्चर्या,साधना असायला हवी अशा वाचनातून
स्वत:ची ओळख
निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन
बोलत होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन व ई-बुक्सचे सामूहिक वाचन
कार्यक्रमाचे उदघाटन तहसिलदार अरविंद नरसीकर
यांच्या हस्ते
करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सूर्यवंशी,संभाजी शिंदे,बसवराज कडगे,कुबेर राठोड,विठठल काळे, शिवाजी पवार,दिनकर कोलते,श्रीनिवास शेजूळे यांची उपस्थिती
होती.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथ प्रदर्शन व ई-बुक्स सामूहिक वाचन या विषयी माहिती दिली. तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारसरणी विषयी माहिती देऊन डॉ.कलामांचे चरित्र सदैव सर्वांना
प्रेरणादायी राहील असा विश्वास व्यक्त केला. निर्मलकुमार सुर्यवंशी,कुबेर राठोड
यांनीही मनेागत व्यक्त केले.
कार्यक्रमात वसंत बारडकर यांनी 75 ग्रंथ व दिनकर कोलते यांनी 1 ग्रंथ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास भेट दिला.
विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शन व ई-बुक्स साहित्याचे मोठया प्रमाणावर वाचन करुन डॉ.कलामांना आदराजंली वाहिली.
विद्यार्थीनींनी वाचन प्रेरणा दिनाची काढलेली सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी केले. संजय कर्वे,अजय वटटमवार,कोंडिबा गाडेवाड,मयूर कल्याणकर,ओंकार कुरुडे, सोपान यनगुलवाड, विठठल यनगुलवाड, आर.डी.मुंजाळ,
सोनाली देशमुख,सुजाता वाघमारे,सुप्रिया
करले यांनी संयोजन केले.
0000000