Saturday, March 11, 2023

वृत्त क्रमांक 118

 शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात

ब्रेस्ट क्लिनिक-ओपीडीचे उद्घाटन

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे विविध व्याधींचे प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याबाबत जनजागृती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त स्तनकर्करोग जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नांदेड येथे शल्यतंत्र विभागाअंतर्गत ब्रेस्ट क्लिनिक-ओपीडीचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. वाय. आर. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजुषा पाटील, महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या ओपीडीचा स्तनकर्करोग जनजागृती व उपचारासाठी निश्चित मोठा लाभ होईल असा सिवश्वास अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी व्यक्त केला. या ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी देऊन महिलांमध्ये स्तनकर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत व विविध ठिकाणी शिबरे आयोजित करून स्तनकर्करोगाविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. या अभियानासाठी डॉ. गंगाधर इंगळे यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. राजेंद्र सोनेकर यांनी केले.

000000

वृत्त क्रमांक 117

अन्न व औषध प्रशासन मंत्री

संजय राठोड यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

रविवार 12 मार्च 2023 रोजी यवतमाळ येथून वाहनाने सकाळी 11 वा. किनवट तालुक्यातील बोथ (तांडा) येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. बोथ (तांडा) येथून शासकीय विश्रामगृह दिग्रस जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000  

 स्त्री समानतेच्या दृष्टीने मानसिकता बदलणे आवश्यक

-  डॉ. गोरक्ष गर्जे

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- समाजात रूढ झालेल्या अनिष्ट गोष्टीस्त्री प्रतिष्ठा कमी करणाऱ्या बाबी संपवून विशेषतः स्त्री समानतेच्या दृष्टीने मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतनचे  प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिवस नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.   

 

महिलांसह मुलींचापण सन्मान केला पाहिजे. त्यांचीप्रती प्रतिष्ठा जपणेआदर बाळगणे यासाठी अशा विविध  कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्णय घेतांना महिलांच्या मताला महत्त्व दिले पाहिजे. महिलांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना महिला सशक्तीकरणाची माहिती दिली पाहिजेअसे सांगून प्राचार्य श्री. गर्जे यांनी नोकरीत असणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचा आपण गौरव करतो तसे गृहणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीयांच्या कामाचा आदर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष  डॉ. अनघा अरविंद जोशी यांनी  स्त्रीवर स्वरचित केलेली कविता सादर केली. संस्थेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.  विविध नामांकित संस्थांमध्ये  नोकरीसाठी निवड झालेल्या तृतीय  वर्षातील विद्यार्थीनींचे  यावेळी स्वागत करण्यात आले.  

 

कु. पल्लवी रेखावार या विद्यार्थींनीने एक स्त्री महिमा सांगणारे गीत सादर केले. कु. कस्तुरे गौरी व कु. अवंतिका गरड या दोघींनी महिला दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. माहिती तंत्रज्ञान तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनीने एक छोटे पथनाट्य सादर केले. सुत्रसंचालन कु. शिवाताई जटाळकर या विद्यार्थीनीने केले तर आभार डॉ. जोशी यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य पी. डी. पोफळेरजिस्टर  श्रीमती ए. व्ही. कदमविभाग प्रमुख एस. पी. कुलकर्णी, एस. एम. कंधारे,.बी. व्ही. यादवएस. एम. डुमणेयु. बी. उश्केवार,  ए. एन. यादवएस. आर. मुधोळकरडॉ. डी. जी. कोल्हटकरडॉ. एस. एस. चौधरीश्रीमती ए. ए. सायरश्रीमती खेडकरश्रीमती दुटाळश्रीमती गलांडेश्रीमती जाधवश्रीमती वाघमारे यांच्यासह  विद्यार्थ्यांची उपस्थित होती.

000000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...