स्त्री समानतेच्या दृष्टीने मानसिकता बदलणे आवश्यक
- डॉ. गोरक्ष गर्जे
नांदेड (जिमाका) दि. 11 :- समाजात रूढ झालेल्या अनिष्ट गोष्टी, स्त्री प्रतिष्ठा कमी करणाऱ्या बाबी संपवून विशेषतः स्त्री समानतेच्या दृष्टीने मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिवस नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
महिलांसह मुलींचापण सन्मान केला पाहिजे. त्यांचीप्रती प्रतिष्ठा जपणे, आदर बाळगणे यासाठी अशा विविध कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्णय घेतांना महिलांच्या मताला महत्त्व दिले पाहिजे. महिलांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना महिला सशक्तीकरणाची माहिती दिली पाहिजे, असे सांगून प्राचार्य श्री. गर्जे यांनी नोकरीत असणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचा आपण गौरव करतो तसे गृहणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीयांच्या कामाचा आदर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ. अनघा अरविंद जोशी यांनी स्त्रीवर स्वरचित केलेली कविता सादर केली. संस्थेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. विविध नामांकित संस्थांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थीनींचे यावेळी स्वागत करण्यात आले.
कु. पल्लवी रेखावार या विद्यार्थींनीने एक स्त्री महिमा सांगणारे गीत सादर केले. कु. कस्तुरे गौरी व कु. अवंतिका गरड या दोघींनी महिला दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. माहिती तंत्रज्ञान तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनीने एक छोटे पथनाट्य सादर केले. सुत्रसंचालन कु. शिवाताई जटाळकर या विद्यार्थीनीने केले तर आभार डॉ. जोशी यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य पी. डी. पोफळे, रजिस्टर श्रीमती ए. व्ही. कदम, विभाग प्रमुख एस. पी. कुलकर्णी, एस. एम. कंधारे,.बी. व्ही. यादव, एस. एम. डुमणे, यु. बी. उश्केवार, ए. एन. यादव, एस. आर. मुधोळकर, डॉ. डी. जी. कोल्हटकर, डॉ. एस. एस. चौधरी, श्रीमती ए. ए. सायर, श्रीमती खेडकर, श्रीमती दुटाळ, श्रीमती गलांडे, श्रीमती जाधव, श्रीमती वाघमारे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थित होती.
000000
No comments:
Post a Comment