Friday, May 12, 2023

राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे 16 मे रोजी आयोजन

 राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे 16 मे रोजी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  भारत सरकारतर्फे 10 लाख युवकांना रोजगार देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत  आजपर्यंत 71 हजार पेक्षा जास्त तरुणांना सरकारी नोकरीचे  नियुक्तीपत्र देण्यात आले. याच धर्तीवर मंगळवार 16 मे रोजी वा राष्ट्रीय  रोजगार मेळावा नांदेडसह  देशभरातील 45 विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यातील एक मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे  आयोजित करण्यात आला आहे.  केंद्रीय रेल्वेकोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवेपालकमंत्री गिरीश महाजनखासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व इतर मान्यवर नांदेड येथील मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

 

या मेळाव्याच्या आयोजनासाठी छ. संभाजीनगर परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल अदनान अहेमद यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

या मेळाव्यादरम्यान भारत सरकारच्या 38 मंत्रालया अंतर्गत विविध विभागांतील सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. त्यापैकी नांदेड येथील मेळाव्यात जवळपास 250 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने व  केंद्रीय रेल्वेकोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. उर्वरीत उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्र दिले जातील.

 

भारत सरकारच्या विविध मंत्रालय व विभागांनी ही भरती प्रक्रिया केली आहे. यात संघ लोक सेवा आयोगकर्मचारी निवड आयोगरेल्वे भर्ती बोर्ड यासारख्या निवड एजन्सीद्वारे या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पुढील दीड वर्षात याच मिशन मोडवर 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे नियोजन असल्याची माहिती नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...