Saturday, January 19, 2019

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, मावाचा
3 लाख 63 हजार रुपयाचा साठा नष्ट
नांदेड दि. 19 :- प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, मावा आदी तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत नुकतेच उमरी येथे न्यायालयात दाखल खटल्यातील 3 लाख 63 हजार 560 रुपयाचा प्रतिबंधित साठा जाळून नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल असून गुन्हा सिद्ध झाल्यास 6 वर्षापर्यंत कारावास व 5 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत आहे. 
गुटखा, पानमसाला, मावा आदी तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग, पोटाचा आजार, अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनाचे आजार, ऱ्हदयविकार यासंबंधीचे आजार होतात. सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने राज्यात उत्पादन, वाहतूक, साठा, वितरण, विक्री यावर बंदी घालण्यात आलेला गुटखा, पानमसाला, मावा, सुगंधित तंबाखु व तत्सम पदार्थ याचा कुठलाही व्यवहार करु नये. समाजाच्या चांगल्या स्वास्थासाठी अन्न व्यावसायिक, विक्रेते, वाहतुक करणारे व्यावसायिक, वाहनधारक, पानपट्टी चालकांनी  हातभार लावावा, असे आवाहन नांदेडचे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे.
000000

बेपत्ता मुलाचा शोध
नांदेड दि. 19 :- कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको येथून शैलेश मणीष सावते (वय 16 वर्षे) हा मुलगा घटक चाचणी परीक्षा देवून दुपारी 3 वाजेनंतर घरी आला नाही. याबाबत चौकशी केली असता तो भेटला नसून अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेले आहे. हा मुलगा दिसल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दूरध्वनी क्र. 02462- 226373 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक ए. व्ही. दिनकर यांनी केले आहे. या मुलाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.  रंग गोरा. उंची 5 फुट 3 इंच. वय 16 वर्षे असून अंगात कपडे काळा शर्ट व निळा पॅट आहे. भाषा मराठी व हिंदी येते. बांधा मध्यम सडपताळ असा आहे. 
0000


लवाद नामतालिकेसाठी
अपात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध
नांदेड दि. 19 :- लवाद नामतालिकेसाठी अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून प्रारुप नामतालिकेवर गुरुवार 31 जानेवारी 2019 पर्यंत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांचे कार्यालयातील कायदा व वैधानिक कार्यवाही कक्षात हरकतीवर 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत निर्णय घेऊन 28 फेब्रुवारी 2019 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिद्ध केली जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी  संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84 (4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी संघटनात्मक व कायदेशीर आणि आर्थिक व लेखाविषयक बाबी बाबत प्रारुप लवाद नामतालिका सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे www.sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे www.mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 
0000000


महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण
तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे
उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी हे 23 व 24 जानेवारी 2019 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 23 जानेवारी 2019 रोजी पुणे येथून पनवेल नांदेड एक्सप्रेसने सकाळी 9.15 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व नांदेड विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 11.45 वा. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत लेंडी प्रकल्प बैठक. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वा. नांदेड विश्रामगृह येथून लेंडी प्रकल्पाकडे प्रयाण. सायं. 4 वा. लेंडी प्रकल्प येथे आगमन. सायं 4 ते 5.30 वाजेपर्यंत लेंडी प्रकल्प येथे भेट. सायं. 5.30 वा. नांदेड विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 7 वा. नांदेड विश्रामगृह येथे आगमन. सायं 7 वाजेपासून पुढे राखीव व भेटी-गाठी.
गुरुवार 24 जानेवारी 2019 रोजी सकाळी 8.30 वा. नांदेड विश्रामगृह येथून माहूरगडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. माहूरगड येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत माहूरगड येथे दर्शन. दुपारी 2 वा. नांदेड विश्रामगृहाकडे प्रयाण.  सायं 4 वा. नांदेड विश्रामगृह येथे आगमन. सायं 5 वा. नांदेड विश्रामगृह येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं 5.30 नांदेड-पनवेल एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करतील.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...