Sunday, August 15, 2021
जिल्ह्यातील
82
केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण
नांदेड
(जिमाका) दि. 15 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 82
लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे
यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते
44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना
कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. सोमवार 16
ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची
संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा
क्षेत्रातील श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,
स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश
हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी,
करबला, तरोडा, विनायकनगर
या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा
रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय
आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना
हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर),
सिडको, पोर्णिमानगर, सांगवी,
करबला, तरोडा, विनायकनगर
या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.
शहरी
भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा
रुग्णालय देगलूर, हदगाव, ग्रामीण
रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर,
मांडवी, लोहा, माहूर,
मुदखेड, बारड, नायगाव या
11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व ग्रामीण रुग्णालय उमरी या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले
आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण
रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर,
कंधार, मांडवी, लोहा,
माहूर, मुदखेड, बारड,
नायगाव, उमरी या 15 ठिकाणी
कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय धर्माबाद
येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 42
प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे
प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.
वरील
सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह
45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा
पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी
करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यात
14 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 8 लाख
93 हजार 400 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड
जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे
प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2
लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त
झाले आहेत.
केंद्र
शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये
कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी
व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील.
यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील
लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण
झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची
वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा
उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या
उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
00000
नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 7 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 659 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 666 एवढी झाली असून यातील 87 हजार 953 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 54 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुदखेड तालुक्यांतर्गत 2, लोहा 2 असे एकुण 4 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 7 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 7 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 54 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 88 हजार 846
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 86 हजार 33
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 666
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 953
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-8
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-54
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3
00000
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागात 14 चारचाकी व 75 दुचाकी वाहनांची भर
पालकमंत्री
अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
असुरक्षित असाल तर डायल करा 112
नांदेड, (जिमाका) दि. 15:- जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी व कोणत्याही वाईट प्रसंग घडण्याआगोदर पोलिसांना निरोप मिळाल्या मिळाल्या तात्काळ घटनास्थळावर हजर राहता यावे जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात आता 14 चारचाकी व 76 दुचाकीची भर पडली आहे. यासाठी 112 एवढे जरी डायल केले तरी गरजूला आवश्यक त्या सर्व सुरक्षिततेच्या सुविधा मिळणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पोलीस मदतीच्या या सेवेला मजबुत करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची उपलब्धतात करुन दिली. या निधीतून नांदेड जिल्हा पोलिस दलांची कार्यक्षमता वाढण्यास मोलाची मदत होऊन गरजू नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी
छोटेखानी समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संवाद साधून पोलिसांना शुभेच्छा
दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड परिक्षेत्राचे
पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार
मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस
अधिक्षक प्रमोद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्याच्या पोलीस
विभागाला 45 चारचाकी वाहने व 76 दुचाकी वाहनाची मंजुरी दिली आहे.
00000
सामान्य माणसाच्या जगण्यातील आव्हाने कमी करण्यासाठी कटिबद्ध
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, (जिमाका) दि. 15:- नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक सुविधेबरोबर इतर सेवा-सुविधाही तेवढ्याच आवश्यक असतात. यादृष्टिने नांदेड महानगरातील गोदावरी परिसरातील विविध घाटांच्या सुशोभीकरणापासून, राष्ट्र पुरुषांच्या पुतळे व स्मारकांपासून आपण नागरिकतेला अधिक सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. विसावा गार्डन हे सुद्धा त्या सजगतेचेच प्रतिक आहे. भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार पद्मविभुषण आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून साकारलेल्या कॉमन मॅनचा पुतळा आता माता गुजरीजी विसावा उद्यानात उभारण्यात आल्याने सामान्य माणसांच्या प्रति महानगरपालिकेचे उत्तरदायित्व अधिक वाढले असून परस्पर विश्वासाचा आणि विकासप्रती कटिबद्धतेचे हे आदर्श मापदंड ठरल्याचे गौरद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.
नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानात आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेल्या कॉमन मॅनच्या शिल्पाचे अनावरण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर मोहिणी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड महानगरामध्ये कॉमन मॅनच्या पुतळ्याची भर टाकू अशा शब्द दिला होता. आर. के. लक्ष्मण यांना मी स्वत: भेटलेलो आहे. त्यांच्या परिवाराशी मी भेटलेलो आहे. सामान्य माणसाच्या नजरेतून एखाद्या घटनेकडे कसे पाहायला पाहिजे, याचे प्रतिक म्हणजे आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला कॉमन मॅन आहे. या कॅमन मॅनच्या पुतळ्याचे उद्घाटन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होणे हे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना वंदन करण्यासारखे असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांची दररोज सकाळी
होणारी तारांबळ रोखण्याच्या उद्देशाने त्यांना एक स्वतंत्र ऊन, वारा, पाऊसापासून
संरक्षण करणाऱ्या जागेची उपलब्धी करुन दिली असून त्यांचा अनौपचारिक शुभारंभही
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात
नांदेड जिल्ह्यातील व्यंगचित्रकारांचा आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचाही सत्कार
करण्यात आला. महापौर येवनकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. व्यंगचित्रकारांतर्फे
बाबुराव गंजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आर. के. लक्ष्मण यांच्या जीवन
कार्याची माहिती दिली. यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते स्त्री
रुग्णालयातील अत्याधुनिक अल्ट्रा सोनोग्राम मशिन (युएसजी), विशेष नवजात शिशू
अतिदक्षता केंद्र, थैलेसिमीया व ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
0000
इंडिया @75 “मिशन आपुलकी” हा उपक्रम जिल्हा प्रशासनाला लोकाभिमुखतेची जोड देईल
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, (जिमाका) दि. 15:- ज्या गावात आपण जन्म घेतला, ज्या गावात आपण वाढलो त्या गावाच्या विकासात आपल्याला घडेल तसे योगदान देणे हे खरे लोकशाहीला अभिप्रेत असलेले लोकसहभागाचे द्योतक आहे. यादृष्टीने इंडिया @75 मिशन आपुलकी हा अभिनव उपक्रम नांदेड जिल्हा प्रशासनाला आपली नवी ओळख देईल असे प्रतिपादन असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे या अभिनव उपक्रमाचा त्यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर आदि मान्यवराची उपस्थिती होती.
या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
यांचे “मिशन आपुलकी” या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करुन कौतुकही
केले. लोकसहभागाचे प्रतिक असणाऱ्या या उपक्रमात मी सुध्दा एक गावचा नागरिक म्हणून
मालेगाव व धनेगाव या दोन्ही गावासाठी माझे योगदान द्यायला आनंदाने तयार असून जिल्हाधिकारी यांनी तशी कामे सूचवावीत असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत मिशन आपुलकी या पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले, तर सुत्रसंचालन श्री. चौधरी यांनी केले.
अनुकंपाधारकांना
नियुक्तीचे आदेश प्रदान
महसूल विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले
आहे, अशा
अनुकंपाधारकांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत देवयानी मधुकर पाठक, कोमल बाबाराव अल्लमवार, ओमकार संतोष डुडले, कल्पना सुभाष भिसे, कल्पना मधुकर भुरके, अजय नरसिंग दुधकावडे, मोहम्मद कैफ गुलाम हाफिज यांना नियुक्तीचे आदेश
प्रदान करण्यात आले.
00000
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या विकासाचे हे प्रतिक
- पालकमंत्री अशोक चव्हाण-
किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड दि. 15 (जिमाका):- सामान्य माणसाला केंद्र स्थानी ठेवून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शासनाच्या सेवा सुविधा प्रभावीपणे पोहचल्या जाव्यात यासाठी वेळोवेळी आपण दक्षता घेत आलो आहोत. तेलंगनाच्या सिमेवर असलेल्या किनवट व माहूर तालुक्यात महसुली सेवा सुविधा गतीमान पध्दतीने पोहचाव्यात यासाठी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारत महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी भागाला आपतकाल प्रसंगी तात्काळ संपर्कात राहावे यासाठी उपलब्ध असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करुन देवू अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भिमराव केराम दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथून जि. प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सांवत, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
जिल्ह्यातील 16 तालुके 8 उप विभागीय कार्यालये ई-प्रणालीद्वारे जोडले आहेत. या प्रणालीद्वारे आज आपण वेगवेगळया ठिकाणी असूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत. तेलंगना सीमेवर असलेल्या किनवट सारख्या आदिवासी भागातील हे कार्यालयही आता सक्षम व सुसज्ज झाले असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सामान्य जनतेच्या महसुली सेवेचे हे केंद्र ठरावे
- महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात महसुल मंत्री
बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. सर्व सामान्य जनतेच्या महसुली सेवा सुविधा या
अधिकाधिक सुलभ व्हाव्यात यासाठी महसुल विभाग प्रयत्नरत आहे. नागरिकांच्या
सातबाऱ्यापासून ते पिक पेऱ्यापर्यत,
विविध आपत्कालिन परिस्थतीच्या नियोजनापासून ते तातडीने करावयाच्या योजनापर्यत कामाची जबाबदारी
ही महसूल यंत्रणेवर आहे. यासर्व सोयी-सुविधा किनवट येथील जनतेपर्यत सुलभ पध्दतीने पोहचविण्यसाठी ही नवीन
प्रशासकीय इमारत महसुली सेवेचे प्रतिक ठरेल असा विश्वास राज्याचे महसुलमंत्री
बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील
कोरोना काळातील सर्व आव्हाने समर्थपणे पेलून जिल्ह्यात इतर विकास कामांवरही तेवढेच
प्रभावीपणे काम करुन दाखविले आहे. ऑनलाईन सातबारा, 8 अ,
2016 चे फेरफार, ई-पिक पाहणी, तलाठी गावे त्यांचा सज्जा ही सर्व कामे शिस्तबध्द पध्दतीने सुरु
असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचा त्यांनी गौरव केला. यावेळी महसुल राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भिमराव केराम यांची यथोचित भाषणे झाली.
0000
पशुधनाच्या उपचारासाठी जिल्ह्यातील 546 गावांमध्ये खोड्यांच्या सुविधेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पशुधनासाठी वैद्यकिय सुविधा
नांदेड (जिमाका) दि. 15 :- ग्रामीण भागात पशुधनावर आवश्यक ते औषधोपचार करता यावेत यासाठी खोड्यांची नितांत गरज असते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खोड्यांची उपलब्धता नसल्याने पशुधनावर उपचार करतांना जनावरांसह शेतकरी व डॉक्टरांनाही त्याचा त्रास व्हायचा. पशुवैद्यकिय उपचारातील ही महत्वाची गरज ओळखून जिल्ह्यात “गाव तेथे खोडा” या उपक्रमांतर्गत 546 गावांमध्ये खोड्यांच्या योजनेचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
या योजनेमुळे आता प्रत्येक गावांमध्ये जनावरांच्या विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. यात लसीकरण, गर्भ तपासणी, वंधत्व तपासणी, रोगनिदान औषधोपचार शक्य होईल. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने मानव विकास कार्यक्रमातर्गंत 9 तालुक्यात ही योजना राबविली जात आहे.
पशुवैद्यकीय
सेवा पुरवितांना जनावरे नियंत्रित करण्यासाठी खोडयाचा वापर होतो. गाभण जनावरे आणि
दुधातील जनावरे यांना लसीकरण, आरोग्य तपासणी, रोग निदान व उपचार करणे सोयीचे होते.
पर्यायाने पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. लहान वासरे, भाकड जनावरे
व बैल यांना आरोग्य सेवा मिळाल्यामूळे त्यांचे आरोग्य आबादीत बैलाच्या मदतीने
शेतीची कामे करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयोग होतो,
असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर यांनी सांगितले.
00000
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना लोकशाही मूल्यांसाठी अधिक कटिबध्द होवू यात
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड दि. 15 (जिमाका) :-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सर्वाच्या आनंदाला उधान येणे स्वाभाविक आहे. हा उत्सव मोठया प्रमाणात आपण साजरा करत असताना यांच्या सोबतच या देशाचा एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देणारा लोकशाहीचा हा उत्सव ठरावा यासाठी आपण सर्वजण कटिबध्द होवू यात, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जिल्ह्यातील नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटिबध्द आहे. मागील काळात जिल्ह्यात अनेक विकासकामे मार्गी लागली असून वेगवेगळे नवीन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात विकास कामाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे नि:संग्धीत प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी ते त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित मान्यवर तसेच अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी निमंत्रितांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, महापौर मोहिनी येवनकर, विशेष माजी मंत्री डी.पी. सावंत, पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, यांच्यासह जिल्हा परिषद, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी श्री. गुरु गोविंदसिंह जिल्हा सामान्य
रुग्णालय लवकरच श्रेणीवर्धन होणार असून सध्या 100 खाटांचे असून तीथे 300 खाटाचे
अद्ययावत असे भव्य रुग्णालय आपण उपलब्ध करुन देत आहोत. त्याचप्रमाणे 170 कोटी
रुपयाचा अंदाजित खर्च असलेले इतर चार प्रकल्प आपण कार्यान्वित करणार आहोत. यात नांदेड
येथील कर्करोगावर उपचारासाठी रेडीओलॉजी युनिट चा समावेश आहे. साथीच्या रोगावर
उपचार करण्यासाठी साथरोगाचे एक अद्ययावत, हद्यरोगावर रुग्णावर उपचार करण्यासाठी नांदेड येथे कॉर्डियाक कॅथलॅबचा
समावेश आहे. भोकर येथील ग्रामीण
रुग्णांलयाचे श्रेणीवर्धन केले असून 100 खाटांचे जिल्हा उप रुग्णालय उभारणार आहोत.
पावडेवाडी भागात 100 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या
तिसऱ्या लाटेसंदर्भात भिती व्यक्त करताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत
ही सांगितले. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक
अंतर या त्रिसुत्रीचा वापर करुन दैनंदिन व्यवहार करावेत असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या
काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार यावेळी
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
000
वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...