Sunday, August 15, 2021

 

इंडिया @75 “मिशन आपुलकी” हा उपक्रम जिल्हा प्रशासनाला लोकाभिमुखतेची जोड देईल

-          पालकमंत्री अशोक चव्हाण

 

नांदेड, (जिमाका) दि. 15:- ज्या गावात आपण जन्म घेतला, ज्या गावात आपण वाढलो त्या गावाच्या विकासात आपल्याला घडेल तसे योगदान देणे हे खरे लोकशाहीला अभिप्रेत असलेले लोकसहभागाचे द्योतक आहे. यादृष्टीने इंडिया @75 मिशन आपुलकी हा अभिनव उपक्रम नांदेड जिल्हा प्रशासनाला आपली नवी ओळख देईल असे प्रतिपादन असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे या अभिनव उपक्रमाचा त्यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला.   

यावेळी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर आदि मान्यवराची उपस्थिती होती.  

या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे “मिशन आपुलकी या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करुन कौतुकही केले. लोकसहभागाचे प्रतिक असणाऱ्या या उपक्रमात मी सुध्दा एक गावचा नागरिक म्हणून

मालेगाव व धनेगाव या दोन्ही गावासाठी माझे योगदान द्यायला आनंदाने तयार असून जिल्हाधिकारी यांनी तशी कामे सूचवावीत असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत मिशन आपुलकी या पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले, तर सुत्रसंचालन  श्री. चौधरी यांनी केले. 

अनुकंपाधारकांना नियुक्तीचे आदेश प्रदान

महसूल विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे, अशा अनुकंपाधारकांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा  नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत देवयानी मधुकर पाठक, कोमल बाबाराव अल्लमवार, ओमकार संतोष डुडले, कल्पना सुभाष भिसे, कल्पना मधुकर भुरके, अजय नरसिंग दुधकावडे, मोहम्मद कैफ गुलाम हाफिज यांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...