Sunday, August 15, 2021

 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागात 14 चारचाकी व 75 दुचाकी वाहनांची भर

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ 

असुरक्षित असाल तर डायल करा 112     

नांदेड, (जिमाका) दि. 15:- जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी व कोणत्याही वाईट प्रसंग घडण्याआगोदर पोलिसांना निरोप मिळाल्या मिळाल्या तात्काळ घटनास्थळावर हजर राहता यावे जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात आता 14 चारचाकी व 76 दुचाकीची भर पडली आहे. यासाठी 112 एवढे जरी डायल केले तरी गरजूला आवश्यक त्या सर्व सुरक्षिततेच्या सुविधा मिळणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पोलीस मदतीच्या या सेवेला मजबुत करण्यासाठी  पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची उपलब्धतात करुन दिली. या निधीतून नांदेड जिल्हा पोलिस दलांची कार्यक्षमता वाढण्यास मोलाची मदत होऊन गरजू नागरिकांना तात्काळ  सेवा उपलब्ध होणार आहेत. 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली. ‍यावेळी छोटेखानी समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संवाद साधून पोलिसांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी  यांनी केले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्याच्या पोलीस विभागाला 45 चारचाकी वाहने व 76 दुचाकी वाहनाची मंजुरी दिली आहे.  

00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...