Tuesday, August 17, 2021

 नांदेड जिल्ह्यात व्यक्ती कोरोना बाधित तर कोरोना बाधित झाले बरे      

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 235 अहवालापैकी अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे एक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 698 एवढी झाली असून यातील 87 हजार 989 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 50 रुग्ण उपचार घेत असून बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये ॲटीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 50 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 91 हजार 149

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 88 हजार 290

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 698

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 989

एकुण मृत्यू संख्या-हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.1 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-5

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-50

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

जिल्ह्यातील 75 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 75 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 18 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालय येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, हदगाव, हिमायतनगर, लोहा या 4 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, धर्माबाद, मांडवी, लोहा, माहूर, बारड, नायगाव, उमरी या 13 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय मुदखेड या केंद्रावर 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 40 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 3 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 16 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 9 लाख 3 हजार 55 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 17 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 

राष्ट्रध्वजाच्या निर्मिती केंद्राला भेट देवून पालकमंत्री अशोक चव्हाण जेव्हा भावूक होतात 

नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती प्रकल्पाला अधिक सक्षम करु

-        - पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड दि. 17 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे जे प्रतिक आहे त्या खादीकडे कृतज्ञतेने मी पाहत आलो आहे. खादीच्या वस्त्रात स्वावलंबनाची बिजे दडलेली आहेत. येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीशी आणि समितीच्या या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राशी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून एक वेगळी कटिबध्दता आम्ही जपत आलो आहोत. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्याच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या या राष्ट्रध्वज निर्मिती व खादी निर्मिती प्रकल्पाच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

राष्ट्रध्वज निर्मितीचे आएसआय मानाकंन असलेले भारतातील सर्वांत जुने केंद्र म्हणून गणल्या गेलेल्या नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या खादी निर्मिती प्रकल्पास त्यांनी आवर्जून भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. सन 1963 मध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची रितसर स्थापना करुन 1967 पासून या केंद्रावर विविध आकारातील मागणीप्रमाणे राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. याचबरोबर खादी वस्त्र आणि इतर साहित्याचीही निर्मिती केली जात होती. कागद निर्मितीचा प्रकल्प अडचणीमूळे बंद करण्यात आला. या खादी निर्मिती प्रकल्पाचे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेवून या केंद्राला नव्या स्वरुपात पुन्हा उभे करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवून विश्वस्ताची सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर, हंसराज वैद्य व इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे स्वागत केले. 

इथे भेट देवून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खादी निर्मितीच्या प्रकल्पामध्ये नांदेड येथील हा प्रकल्प कर्नाटकातील राष्ट्रध्वज निर्मिती प्रकल्पा बरोबर भारताच्या अस्मितेचे हे प्रतिक आहे. महात्मा गांधी यांनी स्वत: सूत कातून खादी निर्मिती अर्थात कपड्याची निर्मिती करुन त्यांचा वापर करण्यापाठीमागे स्वावलंबी जीवनाचा व्यापक अर्थ दिला आहे. स्वातंत्र्याची प्रेरणा ही खादी निर्मिती आणि त्यांच्या वापरातूनही आहे. यांचा अधिकाधिक वापर करुन स्वदेशीचा मंत्र ठरणाऱ्या अशा प्रकल्पास चालना देण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर लवकरच निर्णय घेवू असेही त्यांनी स्पष्ट केले.  सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आठवड्यातील एक दिवस खादीच्या वापरासमवेत कार्यालयीन गरजेतही अधिकाधिक खादीचा वापर कसा केला जाईल यांचेही नियोजन करुन धोरणात्मक निर्णय घेवू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

00000







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...