Thursday, May 28, 2020


पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणीसाठी
6 जून 2020 पर्यंत मुदतवाढ
नांदेड, (जिमाका), दि. 28 :- जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2020-21 साठी ऑनलाईन पीक कर्ज नोंदणी शनिवार 6 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर पीक कर्ज मागणीची नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षीत व्हाव्यात यासाठी सन 2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link   या संकेतस्थळावर ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 दरम्यान करण्याबाबत मुदत दिली होती. या कालावधी दरम्यान नांदेड जिल्ह्यात 1 लाख 70 हजार 240 शेतकऱ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदविली आहे. पीक कर्ज मागणी नोंदणी याद्या व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँक शाखेस पाठविण्यात आल्या आहेत.
खरीप पीक कर्ज हंगामात नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार 6 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.  
00000



नांदेड जिल्ह्यात आज एका रुग्णाची भर
आज प्राप्त झालेल्या 49 अहवालापैकी 47 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 28 मे, 2020 रोजी सांयकाळी  5-00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 49 अहवालापैकी 47 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे. या रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. हा रुग्ण 35 वर्ष वयाचा असून तो लोहार गल्ली, नांदेड भागात राहतो.
जिल्ह्यात आज डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील दोन रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील एक रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील एक रुग्ण असे एकूण चार रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 138 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित 43 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील दोन स्त्री रुग्ण वयवर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे.
गुरुवार 28 मे  रोजी सांयकाळपर्यंतची कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 37 हजार 540, घेतलेले स्वॅब 3 हजार 621, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 132, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 01, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 138, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 141, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 7, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 90, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 41, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 192 एवढी आहे.
काल बुधवार 27 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 73 स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील. तर गुरुवार 28 मे  रोजी 119 रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील.
एकुण 138 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 88 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 41 रुग्णांपैकी 06 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत.  सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...