Tuesday, October 4, 2022

 जिल्ह्यातील 227 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

लाख 70 हजार 824 पशुधनाचे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 4 :- लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला लाख 70 हजार 824 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 227 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आज पर्यंत 24 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य 29 सप्टेंबर 2022 रोजी जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 50 गावे लम्पी बाधित आहेत. या 50 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 23 हजार 956 एवढे आहे. यातील 227 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 298 एवढी आहे. एकुण गावे 348 झाली आहेत. या बाधित 50 गावांच्या किमी परिघातील 348 गावातील (बाधित 50 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 98 हजार 695 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 24 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

निवडणूक ओळखपत्राशी आधार

जोडणीबाबत विशेष प्रसिध्दी मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 4 :-निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणीबाबत व्यापक जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सद्यस्थितीत 50 टक्के आधार जोडणी झाली असून उर्वरित आधार जोडणीसाठी फिरत्या वाहनाद्वारे विशेष प्रसिद्धी मोहिम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते आज फिरत्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून दोन डिजीटल व्हॅन रवाना करण्यात आल्या. निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळेजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारतहसीलदार किरण अंबेकरनायब तहसीलदार स्नेहलता स्वामीऊर्मिला कुलकर्णी, नायब तहसिलदार डी.एन. पोटेफय्याज अहेमद खान, शरद बोरामने व इतर कर्मचारी उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी करण्याबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचे बैठका घेऊन या कामास गती दिली. मतदान केंद्रावर विशेष शिबिरे ही आयोजित केली. शंभर टक्के आधार जोडणी केलेल्या, बिएलओ यांचा  सत्कार करण्यात आला. महाविद्यालये, शाळांमार्फत  राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक नेमून जनजागृती करण्यात आली.

00000



 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळावा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 4 :- अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास नगर पंचायत अर्धापूर व श्रीराम रेफ्रीजरेशन नांदेड या आस्थापनेतील अधिकारी उपस्थित होते. या भरती मेळाव्यात कोपा आणि वेल्डर या व्यवसायातील शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थ्यांची मुलाखत व प्रात्यक्षिक घेवून निवड केलेली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य व्ही.डी. कंदलवाड व संस्थेतील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

0000

 नरहर कुरुंदकर स्मारक नव्या पिढीशी

अधिक जुळण्यासाठी मिळून प्रयत्न करू

-        जिल्हाधिकारी अभिजित राऊत  

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नरहर कुरुंदकरांनी लोकशिक्षण आणि विवेकवाद यात जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. येणाऱ्या काळातही त्यांची ग्रंथसंपदा ही लोकशिक्षकाच्या भूमिकेतून खूप महत्वाची आहे. एक तटस्थ विश्लेषण कसे असू शकते याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी जागर, शिवरात्र, मागोवा, आकलन सारख्या ग्रंथामधून प्रत्यास दिला आहे. त्यांच्या विचाराला प्रवाहित करण्याच्या उद्देशाने नरहर कुरुंदकर स्मारक आणि संशोधन केंद्र काळाची गरज आहे. या केंद्राला नव्यापिढीशी कसे जोडता येईल, त्यादृष्टिने मला काही योगदान देता येईल का हे तपासण्यासाठी मी येथे आल्याची निर्मळ प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

 

नांदेडच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची ओळख अवघ्या मराठी विश्वाला करून देणाऱ्या नरहर कुरुंदकर स्मारकास त्यांनी आज स्वत:हून भेट दिली. यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, कुरुंदकर संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, विश्वस्त प्रा. मधुकर राहेगावकर, लक्ष्मण संगेवार, डॉ. श्रीनिवास पांडे, डॉ. अभय दातार, प्रजावाणी संपादक शंतनू डोईफोडे, प्रा. सावणे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नांदेडला अध्यात्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे. श्री गुरुगोबिंद सिंघजी यांनी ग्रंथाला गुरूच्या स्वरुपात पुढे केले आहे. ग्रंथाला गुरूच्या स्वरुपात पाहणे यापेक्षा मोठी शिकवण असू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

नरहर कुरुंदकर यांनीही समाजाला आवश्यक असलेल्या विवेकी विचारांचा धागा ग्रंथातून आज उपलब्ध आहे. अनेक विषयांवर त्यांची विवेचने हे युवापिढी  पर्यंत जाणे आवश्यक आहे. कुरुंदकर स्मारका सारखी केंद्र हे या जिल्ह्याचे शक्तीस्थळ असून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्याशी कसे जोडता येईल हा खरा प्रश्न आहे. नरहर कुरुंदकर स्मारक अधिक लोकाभिमूख भूमिका घेऊन जे काही प्रयत्न करेल त्यासोबत मी माझ्यापरीने योगदान देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी स्मारकाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे स्वागत केले. या स्मारकास स्वत:हून भेट दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण संगेवार यांनी स्मारकाबाबत माहिती दिली.

000000






  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...