निवडणूक ओळखपत्राशी आधार
जोडणीबाबत विशेष प्रसिध्दी मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 4 :-निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणीबाबत व्यापक जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सद्यस्थितीत 50 टक्के आधार जोडणी झाली असून उर्वरित आधार जोडणीसाठी फिरत्या वाहनाद्वारे विशेष प्रसिद्धी मोहिम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते आज फिरत्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून दोन डिजीटल व्हॅन रवाना करण्यात आल्या. निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी, ऊर्मिला कुलकर्णी, नायब तहसिलदार डी.एन. पोटे, फय्याज अहेमद खान, शरद बोरामने व इतर कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी करण्याबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचे बैठका घेऊन या कामास गती दिली. मतदान केंद्रावर विशेष शिबिरे ही आयोजित केली. शंभर टक्के आधार जोडणी केलेल्या, बिएलओ यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालये, शाळांमार्फत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक नेमून जनजागृती करण्यात आली.
00000
No comments:
Post a Comment