Thursday, February 27, 2025

 वृत्त क्रमांक 235

उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम    

                                                                                                                                                                      नांदेड दि. 27 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                                                                                                                                                                    शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई  येथून विमानाने सकाळी 9.30 वाजता श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. सकाळी 9.35 वाजता मोटारीने प्रयाण, नंतर स्वागत रॅली. नंतर श्री. हुजूर साहिब गुरूद्वारा अबचलनगर, नांदेड येथे दर्शन. सकाळी 10.45 वाजता मोटारीने ओम गार्डन, कौठा, नांदेड जि.नांदेड येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता पक्षप्रवेश कार्यक्रम. नंतर दुपारी 12.20 वाजता कौठा, नांदेड जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 12.20 वा. श्री.मोहनराव हंबर्डे, माजी आमदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी 12.45 वाजता मोटारीने आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे दिपक-ज्योती निवासस्थान, बोरबन, नांदेड येथे आगमन. दुपारी 12.45 वा. राखीव. दुपारी 1.55 मोटारीने कौठा हेलिपॅड आसर्जन मैदान ता. जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने मौजे उमरज हेलिपॅड, ता. कंधार जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता मौजे उमरज हेलिपॅड, ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता मोटारीने उमरज, ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता महंत श्री. गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.35 वाजता मोटारीने बोरी बु. ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 3.35 वा. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या देवस्थानच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.35 वाजता मोटारीने मौजे उमरज हेलिपॅड, ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. सायं. 4.40 वा. हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. रात्री 10.35 वाजता परभणी येथून मोटारीने श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. रात्री 10.40 वाजता विमानाने पुणे कडे प्रयाण करतील. 

00000

वृत्त क्रमांक 234

नांदेड ग्रंथोत्सवाचे आजपासून आरंभ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

नांदेड दि. २७ फेब्रुवारी :  ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री.गुरुगोविंद सिंघजी स्टेडीयम परिसर, नांदेड येथे दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड मधील साहित्यप्रेमी जनतेने या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री.श्रीकांत देशमुख,यांच्या हस्ते होणार आहे.पहिल्या दिवशी दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वा ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा ते कार्यक्रम स्थळ निघेल. यावेळी अजय दत्तात्रय शिंदे,उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते होणार आहे .

उदघाटन सकाळी 11.00वा. श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून मा. अतुल सावे,मंत्री,इतर मागास,बहूजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवंत क्षीरसागर असणार असून प्रमुख अतिथी           खा.अशोकराव शंकरराव चव्हाण, आ.हेमंत श्रीराम पाटील,खा.अजित गोपछडे,खा.रविंद्र वसंतराव चव्हाण, खा.नागेश बापुराव पाटील आष्टीकर, खा. डॉ.शिवाजीराव बंडप्पा काळगे, आ.विक्रम वसंत काळे, आ.सतीश भानुदास चव्हाण, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.भिमराव रामजी केराम, आ. डॉ.तुषार गोविंदराव राठोड, आ.बालाजी देविदासराव कल्याणकर, आ. राजेश संभाजी पवार, आ.जितेश रावसाहेब अंतापूरकर, आ.बाबुराव कदम कोहळीकर, आ.आनंद शंकर तिडके,  आ.श्रीजया अशोकराव चव्हाण,राहुल कर्डिले,जिल्हाधिकारी,नांदेड श्रीमती मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी,नांदेड  अबिनाश कुमार, पोलिस अधिक्षक,नांदेड

डॉ.महेशकुमार डोईफोडे,आयुक्त,म.न.पा.नांदेड,  माजी.आ.ॲड.गंगाधर पटने,अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ,नांदेड  अशोक गाडेकर,ग्रंथालय संचालक,म.रा.,मुंबई.सुनील हुसे,सहाय्यक ग्रंथालय संचालक,छत्रपती संभाजीनगर यांच्यासह मान्यवरांच्या  उपस्थितीत होणार आहे.

पाहिल्या दिवशी  परिसंवाद “AI च्या काळात वाचनसंस्कृतीपुढील आव्हान” घेण्यात येईल. यानंतर  परिसंवाद “भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी पर्वावर सामान्य नागरिकांचे कर्तव्य”घेण्यात येईल.

 दुस-या दिवशी  परिसवांद “मराठी भाषा सवंर्धन आणि घराघरातील प्रयत्न”चे आयोजन करण्यात येईल. दुपारच्या सत्रात “ग्रंथचळवळीतील दलित व ग्रामीण,बालसाहित्याचे योगदान” हा परिसवांद घेण्यात येणार आहे. समारोप अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे माजी खासदार तथा साहित्यिक, मा.संभाजीराव धुळगुंडे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड, गंगाधर पटने माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ, निर्मलकुमार सुर्यवंशी निर्मल प्रकाशन,नांदेड उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहेत. या महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 233

नांदेड शहरातील पूरग्रस्तांनो ! आपले नाव यादीत आहे अथवा नाही तपासणी करा 

 सप्टेंबरमधील क्षतीग्रस्तांची प्राथमिक यादी जाहीर 

नांदेड दि. 26 फेब्रुवारी : गेल्या वर्षीच्या  अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील नागरिकांनी आपली नावे शासनाच्या प्राथमिक  यादीमध्ये आहे अथवा नाही याची खातरजमा करावी.तसेच आक्षेप असल्यास विहित नमुन्यात तहसील कार्यालयात मागणी दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील पूरग्रस्त भागातील घरांमध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी नांदेड यांचे दिनांक 06.09.2024 रोजीच्या आदेशान्वये नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे कर्मचारी व नांदेड शहरातील तलाठी यांनी पंचनामे केले.

महानगरपालिका प्रशासनाने पूरग्रस्त 12 हजार 772 लाभार्थीची यादी तहसील कार्यालयात दाखल केली आहे. प्राथमिक तपासणी करून ही पूरग्रस्तांची यादी नांदेड जिल्ह्याचे संकेतस्थळावर nanded.nic.in वर प्रसिद्धीस देण्यात आली आहे. नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, प्रसिद्धी देण्यात आलेल्या यादीवर आक्षेप असल्यास दिनांक 21.02.2025 ते दिनांक 05.03.2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालय नांदेड येथे विहित नमुन्यात आक्षेप दाखल करावेत. विहित मुदतीनंतर  आक्षेप आल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संजय वरकड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्रमांक 232

माहूरच्या भाविकांना अधिक उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी 

 माहूर गडावरील प्रस्तावित प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी 

नांदेड ( माहूर ) दि.२६ फेब्रुवारी : महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणच्या सोयी सुविधा व प्रस्तावित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्याकडे लक्ष दया, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज माहूर येथे दिल्या.

 माहूर गडावर आज त्यांनी भेट दिली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे  उपकार्यकारी अभियंता भोकर प्रशांत कोरे,तहसीलदार किशोर यादव,मंदिर विश्वस्त उपस्थित होते. या ठिकाणी उभारल्या जात असलेला लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाची पाहणी, गडावरील दुकानदारांच्या समस्या,रस्त्यांचे विस्तारीकरण, सुशोभीकरण तसेच माहुरच्या विविध ठिकाणी भेटी देताना श्रद्धाळू व पर्यटकांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी, विश्वस्तांची चर्चा केली.

प्राचीन ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या माहूरगडासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या परिसरातील अतिक्रमण, फेरीवाल्यांच्या समस्या आणि सर्व प्रलंबित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी त्यांनी माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.

000000







 वृत्त क्रमांक 231

दोन दिवशीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन 

विविध कार्यक्रमाची मेजवानी व भव्य ग्रंथप्रदर्शन 

नांदेड ग्रंथोत्सवाचे उद्यापासून आरंभ 

नांदेड दि. २६ फेब्रुवारी : दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन व ग्रंथ प्रदर्शन व विक्री , विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथालय संचालनालय,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री.गुरुगोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसर, नांदेड-431602 येथे दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवार दिनांक 28/02/2025 रोजी सकाळी 11.00 वा श्रीकांत देशमुख,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वा ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा ते कार्यक्रम स्थळ निघेल. यावेळी  अजय दत्तात्रय शिंदे,उपजिल्हाधिकारी नांदेड, उपस्थित राहणार आहेत.

उदघाटन सकाळी 11.00वा. मा.श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून मा.श्री अतुल सावे,मंत्री,इतर मागास,बहूजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवंत क्षीरसागर असणार असून प्रमुख अतिथी श्री अशोकराव शंकरराव चव्हाण,राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मा.श्री हेमंत श्रीराम पाटील,विधान परिषद सदस्य तथा मा.अध्यक्ष मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मा.खा.श्री अजित गोपछडे,राज्यसभा सदस्य, मा.खा.प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण,मा.संसद सदस्य-16-नांदेड  लोकसभा मतदार संघ,मा.खा.श्री.नागेश बापुराव पाटील आष्टीकर, मा.संसद सदस्य 15-हिंगोली लोकसभा  मतदार संघ, मा.खा.श्री डॉ.शिवाजीराव बंडप्पा काळगे,मा.संसद सदस्य,41-लातूर  लोकसभा मतदार संघ, मा.आ.श्री विक्रम वसंत काळे,मा.विधानपरिषद सदस्य, मा.आ.श्री.सतीश भानुदास चव्हाण,मा.विधानपरिषद  सदस्या, मा.आ.श्री.प्रताप पाटील चिखलीकर, मा.विधानसभा सदस्य 88-लोहा विधानसभा मतदार संघ,  मा.आ.श्री.भिमराव रामजी केराम,मा. विधानसभा सदस्य 83-किनवट विधानसभा मतदार संघ, मा.आ.श्री डॉ.तुषार गोविंदराव राठोड,                मा. विधानसभा सदस्य 91 -मुखेड विधानसभा मतदार संघ,मा.आ.श्री बालाजी देविदासराव कल्याणकर, मा.  विधानसभा  सदस्य 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ  मा.आ.श्री राजेश संभाजी पवार, ,मा.विधानसभा सदस्य 89- नायगाव विधानसभा मतदारसंघ, मा.आ.श्री.जितेश रावसाहेब अंतापूरकर, ,मा.विधानसभा सदस्य 90-देगलूर विधानसभा मतदारसंघ मा.आ.श्री.बाबुराव कदम कोहळीकर, ,मा.विधानसभा सदस्य 84- हदगाव विधानसभा मतदारसंघ,आ.श्री.आनंद शंकर तिडके, ,मा.विधानसभा सदस्य 87नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ,   मा.आ.कु.श्रीजया अशोकराव चव्हाण, ,मा.विधानसभा सदस्य 85-भोकर विधानसभा मतदारसंघ

प्रमुख उपस्थिती   मा.श्री.राहुल कर्डिले,(भा.प्र.से.)जिल्हाधिकारी,नांदेड  मा.श्रीमती मिनल करनवाल, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी,नांदेड  मा.श्री.अभिषेक कुमार, ,(भा.पो.से.) पोलिस अधिक्षक,नांदेड

मा.श्री.डॉ.महेशकुमार डोईफोडे,आयुक्त,म.न.पा.नांदेड  मा.आ.ॲड.गंगाधर पटने,अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ,नांदेड  मा.श्री.अशोक गाडेकर,ग्रंथालय संचालक,म.रा.,मुंबई.मा.श्री.सुनील हुसे,सहाय्यक ग्रंथालय 

संचालक,छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.प्रताप सुर्यवंशी,राज्य निरीक्षक,मुंबई,मा.श्री.कैलाशचंद्र गायकवाड,तांत्रिक सहाय्यक,नांदेड,अनिल बाविस्कर (मुख्य लिपिक),अजय राजाराम वट्टमवार (निर्गम सहाय्यक) उपस्थित राहणार आहेत.सुत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक नारायण शिंदे करतील.

दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत परिसंवाद AI च्या काळात वाचनसंस्कृतीपुढील आव्हान घेण्यात येईल. त्यामध्ये अध्यक्ष मा.प्रो.डॉ.पराग भालचंद्र,संगणकशास्त्र विभाग,स्वा.रा.ति.म.वि.नांदेड, सहभाग मा.श्री.सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक,नांदेड,  मा.श्री.सचिन नरंगले,इलेक्ट्रानिक मिडिया विभाग, स्वा.रा.ति.म.वि.नांदेड  यांचा सहभाग असेल. संचलन मा.नवनाथ कदम  हे करतील.

दुपारी 4.00 ते 6.00 या वेळेत परिसंवाद भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी पर्वावर सामान्य नागरिकांचे कर्तव्य,घेण्यात येईल वक्ते मा.श्री भिमराव राऊत, लेखक व अनुवादक, सूत्रसंचालन बालाजी नारलेवाड हे करतील.

दुस-या दिवशी 1 मार्च2025 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वेळेत परिसवांद “मराठी भाषा सवंर्धन आणि घराघरातील प्रयत्न”चे आयोजन करण्यात येईल.अध्यक्षस्थानी मा.डॉ.पृथ्वीराज तौर,मराठी विभाग प्रमुख स्वा.रा.ति.म.वि.नांदेड राहतील,सहभाग मा.श्रीमती.सुचिता खल्लाळ,राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखिका शिक्षण विस्तार अधिकारी,प्रा.डॉ.शारदा कदम,बर्हिजी महाविद्यालय,बसमत, मा.श्री.विकास जोशी,पत्रकार.

दुपारी 2.00 ते 4.00 ग्रंथचळवळीतील दलित व ग्रामीण,बालसाहित्याचे योगदान या परिसवांदाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी रविचंद्र हडसनकर ज्येष्ठ साहित्यिक, सहभाग मा.डॉ.कमलाकर चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक, मा.श्री.शंकर वाडेवाले ज्येष्ठ साहित्यिक, मा.श्री.श.ल.नाईक बालसाहित्यिक यांचा सहभाग असेल. सुत्रसंचलन मा.श्री.भानुदास पवळे हे करतील.

सायंकाळी 4.00 वाजता समारोप अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे माजी खासदार तथा साहित्यिक, मा.संभाजीराव धुळगुंडे माजी अध्यक्ष जिल्हापरिषद नांदेड, मा.ॲड.गंगाधर पटने माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ, मा.निर्मलकुमार सुर्यवंशी निर्मल प्रकाशन,नांदेड उपस्थित राहणार आहेत. ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहेत. या महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 235 उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम                                                                    ...