वृत्त क्रमांक 231
दोन दिवशीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन
विविध कार्यक्रमाची मेजवानी व भव्य ग्रंथप्रदर्शन
नांदेड ग्रंथोत्सवाचे उद्यापासून आरंभ
नांदेड दि. २६ फेब्रुवारी : दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन व ग्रंथ प्रदर्शन व विक्री , विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथालय संचालनालय,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री.गुरुगोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसर, नांदेड-431602 येथे दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवार दिनांक 28/02/2025 रोजी सकाळी 11.00 वा श्रीकांत देशमुख,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वा ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा ते कार्यक्रम स्थळ निघेल. यावेळी अजय दत्तात्रय शिंदे,उपजिल्हाधिकारी नांदेड, उपस्थित राहणार आहेत.
उदघाटन सकाळी 11.00वा. मा.श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून मा.श्री अतुल सावे,मंत्री,इतर मागास,बहूजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवंत क्षीरसागर असणार असून प्रमुख अतिथी श्री अशोकराव शंकरराव चव्हाण,राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मा.श्री हेमंत श्रीराम पाटील,विधान परिषद सदस्य तथा मा.अध्यक्ष मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मा.खा.श्री अजित गोपछडे,राज्यसभा सदस्य, मा.खा.प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण,मा.संसद सदस्य-16-नांदेड लोकसभा मतदार संघ,मा.खा.श्री.नागेश बापुराव पाटील आष्टीकर, मा.संसद सदस्य 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ, मा.खा.श्री डॉ.शिवाजीराव बंडप्पा काळगे,मा.संसद सदस्य,41-लातूर लोकसभा मतदार संघ, मा.आ.श्री विक्रम वसंत काळे,मा.विधानपरिषद सदस्य, मा.आ.श्री.सतीश भानुदास चव्हाण,मा.विधानपरिषद सदस्या, मा.आ.श्री.प्रताप पाटील चिखलीकर, मा.विधानसभा सदस्य 88-लोहा विधानसभा मतदार संघ, मा.आ.श्री.भिमराव रामजी केराम,मा. विधानसभा सदस्य 83-किनवट विधानसभा मतदार संघ, मा.आ.श्री डॉ.तुषार गोविंदराव राठोड, मा. विधानसभा सदस्य 91 -मुखेड विधानसभा मतदार संघ,मा.आ.श्री बालाजी देविदासराव कल्याणकर, मा. विधानसभा सदस्य 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ मा.आ.श्री राजेश संभाजी पवार, ,मा.विधानसभा सदस्य 89- नायगाव विधानसभा मतदारसंघ, मा.आ.श्री.जितेश रावसाहेब अंतापूरकर, ,मा.विधानसभा सदस्य 90-देगलूर विधानसभा मतदारसंघ मा.आ.श्री.बाबुराव कदम कोहळीकर, ,मा.विधानसभा सदस्य 84- हदगाव विधानसभा मतदारसंघ,आ.श्री.आनंद शंकर तिडके, ,मा.विधानसभा सदस्य 87नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, मा.आ.कु.श्रीजया अशोकराव चव्हाण, ,मा.विधानसभा सदस्य 85-भोकर विधानसभा मतदारसंघ
प्रमुख उपस्थिती मा.श्री.राहुल कर्डिले,(भा.प्र.से.)जिल्हाधिकारी,नांदेड मा.श्रीमती मिनल करनवाल, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी,नांदेड मा.श्री.अभिषेक कुमार, ,(भा.पो.से.) पोलिस अधिक्षक,नांदेड
मा.श्री.डॉ.महेशकुमार डोईफोडे,आयुक्त,म.न.पा.नांदेड मा.आ.ॲड.गंगाधर पटने,अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ,नांदेड मा.श्री.अशोक गाडेकर,ग्रंथालय संचालक,म.रा.,मुंबई.मा.श्री.सुनील हुसे,सहाय्यक ग्रंथालय
संचालक,छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.प्रताप सुर्यवंशी,राज्य निरीक्षक,मुंबई,मा.श्री.कैलाशचंद्र गायकवाड,तांत्रिक सहाय्यक,नांदेड,अनिल बाविस्कर (मुख्य लिपिक),अजय राजाराम वट्टमवार (निर्गम सहाय्यक) उपस्थित राहणार आहेत.सुत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक नारायण शिंदे करतील.
दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत परिसंवाद AI च्या काळात वाचनसंस्कृतीपुढील आव्हान घेण्यात येईल. त्यामध्ये अध्यक्ष मा.प्रो.डॉ.पराग भालचंद्र,संगणकशास्त्र विभाग,स्वा.रा.ति.म.वि.नांदेड, सहभाग मा.श्री.सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक,नांदेड, मा.श्री.सचिन नरंगले,इलेक्ट्रानिक मिडिया विभाग, स्वा.रा.ति.म.वि.नांदेड यांचा सहभाग असेल. संचलन मा.नवनाथ कदम हे करतील.
दुपारी 4.00 ते 6.00 या वेळेत परिसंवाद भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी पर्वावर सामान्य नागरिकांचे कर्तव्य,घेण्यात येईल वक्ते मा.श्री भिमराव राऊत, लेखक व अनुवादक, सूत्रसंचालन बालाजी नारलेवाड हे करतील.
दुस-या दिवशी 1 मार्च2025 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वेळेत परिसवांद “मराठी भाषा सवंर्धन आणि घराघरातील प्रयत्न”चे आयोजन करण्यात येईल.अध्यक्षस्थानी मा.डॉ.पृथ्वीराज तौर,मराठी विभाग प्रमुख स्वा.रा.ति.म.वि.नांदेड राहतील,सहभाग मा.श्रीमती.सुचिता खल्लाळ,राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखिका शिक्षण विस्तार अधिकारी,प्रा.डॉ.शारदा कदम,बर्हिजी महाविद्यालय,बसमत, मा.श्री.विकास जोशी,पत्रकार.
दुपारी 2.00 ते 4.00 ग्रंथचळवळीतील दलित व ग्रामीण,बालसाहित्याचे योगदान या परिसवांदाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी रविचंद्र हडसनकर ज्येष्ठ साहित्यिक, सहभाग मा.डॉ.कमलाकर चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक, मा.श्री.शंकर वाडेवाले ज्येष्ठ साहित्यिक, मा.श्री.श.ल.नाईक बालसाहित्यिक यांचा सहभाग असेल. सुत्रसंचलन मा.श्री.भानुदास पवळे हे करतील.
सायंकाळी 4.00 वाजता समारोप अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे माजी खासदार तथा साहित्यिक, मा.संभाजीराव धुळगुंडे माजी अध्यक्ष जिल्हापरिषद नांदेड, मा.ॲड.गंगाधर पटने माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ, मा.निर्मलकुमार सुर्यवंशी निर्मल प्रकाशन,नांदेड उपस्थित राहणार आहेत. ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहेत. या महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment