वृत्त क्रमांक 235
उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम
नांदेड दि. 27 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.30 वाजता श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. सकाळी 9.35 वाजता मोटारीने प्रयाण, नंतर स्वागत रॅली. नंतर श्री. हुजूर साहिब गुरूद्वारा अबचलनगर, नांदेड येथे दर्शन. सकाळी 10.45 वाजता मोटारीने ओम गार्डन, कौठा, नांदेड जि.नांदेड येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता पक्षप्रवेश कार्यक्रम. नंतर दुपारी 12.20 वाजता कौठा, नांदेड जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 12.20 वा. श्री.मोहनराव हंबर्डे, माजी आमदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी 12.45 वाजता मोटारीने आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे दिपक-ज्योती निवासस्थान, बोरबन, नांदेड येथे आगमन. दुपारी 12.45 वा. राखीव. दुपारी 1.55 मोटारीने कौठा हेलिपॅड आसर्जन मैदान ता. जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने मौजे उमरज हेलिपॅड, ता. कंधार जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता मौजे उमरज हेलिपॅड, ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता मोटारीने उमरज, ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता महंत श्री. गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.35 वाजता मोटारीने बोरी बु. ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 3.35 वा. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या देवस्थानच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.35 वाजता मोटारीने मौजे उमरज हेलिपॅड, ता. कंधार, जि. नांदेड येथे आगमन. सायं. 4.40 वा. हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. रात्री 10.35 वाजता परभणी येथून मोटारीने श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. रात्री 10.40 वाजता विमानाने पुणे कडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment