वृत्त क्रमांक 233
नांदेड शहरातील पूरग्रस्तांनो ! आपले नाव यादीत आहे अथवा नाही तपासणी करा
सप्टेंबरमधील क्षतीग्रस्तांची प्राथमिक यादी जाहीर
नांदेड दि. 26 फेब्रुवारी : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील नागरिकांनी आपली नावे शासनाच्या प्राथमिक यादीमध्ये आहे अथवा नाही याची खातरजमा करावी.तसेच आक्षेप असल्यास विहित नमुन्यात तहसील कार्यालयात मागणी दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील पूरग्रस्त भागातील घरांमध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी नांदेड यांचे दिनांक 06.09.2024 रोजीच्या आदेशान्वये नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे कर्मचारी व नांदेड शहरातील तलाठी यांनी पंचनामे केले.
महानगरपालिका प्रशासनाने पूरग्रस्त 12 हजार 772 लाभार्थीची यादी तहसील कार्यालयात दाखल केली आहे. प्राथमिक तपासणी करून ही पूरग्रस्तांची यादी नांदेड जिल्ह्याचे संकेतस्थळावर nanded.nic.in वर प्रसिद्धीस देण्यात आली आहे. नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, प्रसिद्धी देण्यात आलेल्या यादीवर आक्षेप असल्यास दिनांक 21.02.2025 ते दिनांक 05.03.2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालय नांदेड येथे विहित नमुन्यात आक्षेप दाखल करावेत. विहित मुदतीनंतर आक्षेप आल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संजय वरकड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment